घरमहाराष्ट्रमुंबई विमानतळाला आता नाशिकचा पर्याय

मुंबई विमानतळाला आता नाशिकचा पर्याय

Subscribe

ओझर विमानतळावर नाईट लँडिंगला अखेर परवानगी, डीजीसीएच्या मंजुरीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे शक्य

ओझर विमानतळावर नाईट लँडिंग करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानतळांशी कनेक्ट होण्याबरोबरच नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय उड्डाणेही शक्य होणार आहे. या सुविधेमुळे ओझर विमानतळावरुन पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तसेच, मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीचा भार लक्षात घेता याला नाशिक हा व्यवहार्य पर्याय ठरणार आहे.

ओझर विमानतळावर नाईट लँडिंग, तसेच इंधन भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे. परंतु, प्रवासी विमान वाहतुकीसाठी नाईट लँडिंग किंवा टेक ऑफसाठी डीजीसीएचे प्रमाणपत्र बंधनकारक असते. ओझर विमानतळ एचएएलच्या अखत्यारित असल्याने एचएएलकडे हेे प्रमाणपत्र नाही. एचएएलने त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सोयी-सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्यानुसार डीजीसीएच्या अधिकार्‍यांनी फेबु्रवारी महिन्यात ओझर विमानतळाची पाहणी केली. अखेर सर्व चाचण्यांनंतर डीजीसीएने ओझर नाईट लँडिंगला परवानगी दिली. यामुळे नाशिक देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडले जाणार आहे.

- Advertisement -

स्वस्त इंधन अन् पार्किंगही

उडाण योजनेमुळे मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक वाढल्याने अनेकदा टाइम स्लॉट देताना विलंब होतो. सद्यस्थितीत मुंबई विमानतळावरून दररोज तब्बल ९०० हून अधिक विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग होते. हा सारा व्याप आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाचे काम या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मुंबईला पर्यायी विमानतळ कोणते, यासाठी गांभीर्याने विचार सुरू आहे. ओझर विमानतळावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास मुंबईला सक्षम पर्याय म्हणून हे विमानतळ उत्तम पर्याय ठरू शकते. त्यामुळे हवाई वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

असा होईल फायदा

मुंबईनंतर १५० किलोमीटरच्या परिघात अन्य विमानतळ नाही. सध्या अहमदाबाद विमानतळ मुंबईला पर्याय म्हणून वापरले जाते. मुंबई-अहमदाबादचे हवाई अंतर २४० मैल आहे. त्या तुलनेत मुंबईपासून नाशिकचे हवाई अंतर केवळ ९७.८ मैल आहे. त्यामुळे मुंबई-ओझर प्रवासासाठी ०.३० मिनिटे आणि ७५० लिटर इंधन लागते. याच तुलनेत अहमदाबादला ०.४६ मिनिटांचा वेळ आणि २००० लिटर इंधन लागते. त्यामुळे ओझरचा पर्याय फायदेशीर ठरेल. ओझरला येताना आणि जाताना प्रवाशी वाहतुकीतूनही विमान कंपन्यांना आर्थिक लाभही होऊ शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -