घरट्रेंडिंगहोऊ दे खर्च! बर्गर खायला बुक केले २ लाखांचे हेलिकॉप्टर!

होऊ दे खर्च! बर्गर खायला बुक केले २ लाखांचे हेलिकॉप्टर!

Subscribe

प्रत्येकाला केव्हाना केव्हा आपले आवडते पदार्थ खाण्याची हुक्की येते. त्यामुळे अनेक जण तो आवडता पदार्थ कसा त्वरित खायला मिळेल याचा विचार करतो. अशाच प्रकारे एका व्यक्तीला बर्गर खाण्याची इच्छा झाली. पण त्याच्या आजूबाजूच्या परिसरात त्याला आवडले असा बर्गर मिळाला नाही. म्हणून त्यानंतर त्याने दोन तासांसाठी हेलिकॉप्टर बुक केले आणि तो मॅकडोनाल्डच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. ही घटना रशियामधील आहे.

mirror.co.ukच्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे नाव विक्टर मार्टिनोव असून तो खूप श्रीमंत व्यक्ती आहे. त्याला फक्त बर्गर खाण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी त्याने दोन तासांसाठी हेलिकॉप्टर बुक केले. विक्टर हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. करोडपती विक्टरने मॅकडोनाल्डपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास २ लाख रुपये खर्च करून हेलिकॉप्टरची राइट केली. तो गर्लफ्रेंडला सोबत घेऊन बर्गर खाण्यासाठी गेला होता.

- Advertisement -

दरम्यान ३३ वर्षाचा विक्टर क्रीमियामध्ये सुट्टी एन्जॉय करत होता. त्यादरम्यान त्याला मॅकडीचा बर्गर खाण्याची लहर आली. त्यानंतर त्याने क्राइमियापासून क्रास्नोडरचा प्रवास केला. हेलिकॉप्टर घेऊन तो जवळपास ३६० किमी दूरच्या मॅकडी रेस्टॉरंटमध्ये गेला. रेस्टॉरंटमध्ये विक्टरने बिग मॅक, फ्रेंच फ्राईज, मिल्कशेक इत्यादी पदार्थांची त्याने ऑर्डर केली. रेस्टॉरंटचे बिल सुमारे ४ लाख ८५९ रुपये आले होते. दरम्यान हेलिकॉप्टर भांड्याने देणाऱ्या कंपनीने सांगितले की, ‘यापूर्वी अशा प्रकारे बुकिंग करण्यात आली नव्हती.’


हेही वाचा – कडक भावा! निघालं कोल्हापूरचं कनेक्शन पण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -