घरमहाराष्ट्रनाशिकविधानसभेसाठी शहरात १०० मतदान केंद्र वाढणार

विधानसभेसाठी शहरात १०० मतदान केंद्र वाढणार

Subscribe

सर्व्हेक्षणात ६० मतदान केंद्र संवेदनशील ठरवले

 विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहीमेत सुमारे २ लाख १० हजार नवमतदारांची भर पडल्याने मतदान केंद्रांची पुर्नरचना करण्यात येत आहे. त्यानूसार जिल्हयात लोकसभा निवडणूकीपेक्षा १०० मतदान केंद्राची वाढ होणार आहे. हे सर्व वाढीव मतदार केंद्र शहरी lectionभागात आहेत.

जिल्हयात सध्या ४७२० मतदान केंद्रे आहेत ही संख्या आता ४ हजार ८२० पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार मतदारसंख्या वाढल्यास नविन मतदान केंद्र निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शहरी भागात १४०० तर ग्रामीण भागात १२०० मतदार याप्रमाणे निकष ठरवून देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूकित या निकषाप्रमाणे २७४ मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली होती. लोकसभा निवडणूकीत नव्याने वाढलेल्या मतदारांची संख्या विधानसभा निवडणूकीतही वाढली आहे. जिल्हयात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहीमेत २ लाख १० हजार नवमतदरांची नोंद करण्यात आली. यात आणखी ६० हजाराने वाढ झाली आहे.

- Advertisement -

६० मतदान केंद्र संवेदनशील

विधानसभा निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात ६० हून अधिक मतदान केंद्र संवेदनशील ठरविण्यात आली आहेत याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून या केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्हीव्दारे या मतदान केंद्रावर नजर राहणार आहे. लोकसभा निवडणूकीत संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ६० होती यात पाचने वाढ होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -