घरमहाराष्ट्रनाशिककुल्फी आईस्क्रीमच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ

कुल्फी आईस्क्रीमच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ

Subscribe

ऊसाचा रसही झाला महाग

 नाशिक : यंदा अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याला एक ते दीड महिना उशिराने सुरुवात झाली. त्यातच बदलत्या वातावणामुळे उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. या उकाड्यावरील उतारा अर्थात कुल्फीसह रसाच्याही किंमतीत यंदा तब्बल २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे हा गारवा खिशासाठी मात्र गरम पडणार आहे.

लोकल ते ब्रँडेड कंपन्यांनी आईसक्रीमच्या किमतीत २० टक्कयांपर्यंत वाढ केली आहे. शहराच्या कोणत्याही भागात अगदी सहज उपलब्ध असणार्‍या ऊसाच्या रसाच्या किंमतीतदेखील ५  ते १०  टक्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ ही या भाववाढीचे मुख्य कारण असल्याचे व्यापार्‍यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. गेल्यावर्षी उन्हाळयात संपूर्ण भारतात जवळपास सुमारे ११,०००  कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. हा आकडा यंदा अजून वाढण्याची शक्यता आईस्क्रिम निर्मात्या कंपन्यांकडून वर्तविली जाते आहे.

- Advertisement -

कच्चा मालाच्या किमती आणि वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे ही भाववाढ झाल्याचे बहुतांश व्यावसायिकांचे म्हणणे आहे. याशिवाय हातगाडीवर गोळा, सरबत, ऊसाचा रस विकणार्‍यांनीदेखील बर्फाच्या किमतीत वाढ झाल्याने १५  टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. यामागे वाढलेल्या इंधनाच्या किंमतीचेही प्रमुख कारण आहे. परंतु, उकाड्याने हैराण झालेले नाशिककर पैशांचा फारसा विचार न करता दुपारी आइसक्रीम पार्लरमध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत.

यामुळे वाढले भाव :

कुल्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य. त्यात दूध, ड्रायफ्रूट, विविध फ्लेवर, साखर, रंग, क्रीम यांच्या किंमतीत वाढ झाल्याने कुल्फी बनवणे महाग झाले आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी आपल्या उत्पादनांमध्ये किंमतीत सुमारे 20 ते 25 टक्क्यांची वाढ केली आहे.

- Advertisement -

ऑनलाईन ऑर्डर

हल्ली ऑनलाईन फूड डिलिवरीला मोठी पसंती मिळताना दिसत आहे. त्यातच या डिलिवरी अ‍ॅप्सने आईस्क्रीम आणि कुल्फीची होम डिलिवरी सुरू केल्याने विक्रेत्यांच्या खपात कमालीची वाढ झाली आहे.

अशा आहेत किंमती

  • मावा कुल्फी : ३०
  • पिस्ता कुल्फी : ३५
  • चॉकलेट कुल्फी : ३५
  • मिक्स ड्रायफ्रूट कुल्फी : ४०
  • गुलकंद कुल्फी : ४०
  • आईसक्रीम फॅमिली पॅक : १५० रुपयांपासून पुढे
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -