घरक्राइम'हायप्रोफाइल' पारख पतसंस्थेतील २२ कोटी अपहारातील 'ते' दोघे आरोपी २ वर्षांनी जाळ्यात

‘हायप्रोफाइल’ पारख पतसंस्थेतील २२ कोटी अपहारातील ‘ते’ दोघे आरोपी २ वर्षांनी जाळ्यात

Subscribe

नाशिक : येवला येथील सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेतील २२ कोटी रुपये अपहारप्रकरणी दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देणार्‍या व्यवस्थापक तथा माजी स्वीकृत नगरसेवक अजय भागचंद जैन ऊर्फ छाजेड आणि अक्षय रवींद्र छाजेड (दोघेही रा. श्रीकृष्ण कॉलनी, विंचूर रोड, येवला) यांना नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने मनमाड शहरातून अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणात पोलिसांनी ‘गोल्डशर्ट’साठी चर्चेत आलेल्या पंकज पारख याच्यासह १७ संशयितांवर गुन्हा दाखल आहे.

२०२१ मध्ये येवला येथील सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक व संस्थेचे कर्मचारी यांनी संगनमत करून खातेदार व ठेवीदारांना विविध योजनांचे जास्त व्याजदराचे अमिष दाखवून विश्वास संपादन केले. मात्र, सर्वांनी ठेवीदारांचे पैशांचा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी उपयोग करून ठेवीदारांची रक्कम २१ कोटी ९६ लाख ९९ हजार ८५० रूपयांची फसवणूक केली.

- Advertisement -

याप्रकरणी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी येवला शहर पोलीस ठाण्यात येवला सहायक निबंधक प्रताप पाडवी यांच्या फिर्यादीवरुन पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थापक पंकज पारखसह अध्यक्ष योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि चार वसुली अधिकार्‍यांसह दहा संचालकांचा समावेश आहे. १४ महिने पोलिसांना गुंगारा देणार्‍या पारखला काही महिन्यांपूर्वी अटक झाली.

मुख्य आरोपी अजय जैन हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यास अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले होते. पोलीस त्याच्या मागावर होते. जैन हा गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रसह राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश राज्यांमधील विविध शहरांमध्ये आपले अस्तित्व लपवून वास्तव्य करत होता. तपास पथकास तो संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे समजले. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज एम. आय. डी. सी. परिसरात शोध घेतला असता, तो मनमाड शहरात गेला असल्याची माहिती मिळाली.

- Advertisement -

अजय भागचंद जैन यास मनमाड शहारातील माधवनगर परिसरातून अटक केली. त्याच्यासोबत गुन्हयातील फरार असलेला संशयित अक्षय छाजेड, यास देखील अटक केली आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, चालक पोलीस नाईक फड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बस्ते यांनी दोघांनी अटक केली. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे करीत आहेत.

कोण आहे अजय जैन

अजय भागचंद जैन हा येवला शहरातील सुभाषचंदजी पारख नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक होते. पतसंस्थेचा सर्व कारभार अजय जैन यांच्या सांगण्यानुसार केले जात होते. तो चार वर्षे येवला नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक होता. त्याची इंग्रजी माध्यमाची एक खासगी शाळा आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याशी त्याची जवळीक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोल्डमॅन पंकज पारखला जामीन

येवला नगरपरिषदेचा माजी नगराध्यक्ष तथा गोल्डमॅन पंकज पारख याला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी नाशिक शहरातून अटक झाली होती. मात्र, त्याला अटी-शर्तींनुसार काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -