घरताज्या घडामोडीमालेगावात रिपोर्ट येण्यापूर्वीच एकाचा मृत्यू; नाशकात नवीन चार रुग्ण पॉझिटिव्ह

मालेगावात रिपोर्ट येण्यापूर्वीच एकाचा मृत्यू; नाशकात नवीन चार रुग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मालेगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. शनिवारी (दि.18) नाशिक शहरात 4 व मालेगावात 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून मालेगावात एका 35 वर्षांच्या तरुणाचा रिपोर्ट येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. मालेगावात 68 कोरोनाबाधित रुग्ण असून पाचजणांचा बळी गेला आहे. नाशिक जिल्ह्यात आता 79 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

मालेगावच्या जीवन हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, मात्र रिपोर्ट येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शुक्रवारी सकाळी मृत्यू झालेले 81 वर्षीय पुरुष डॉक्टर, तर 13 तारखेला मृत्यू झालेल्या 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात शनिवारी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारही पॉझिटिव्ह रुग्ण अंबड सातपूर लिंक रोड परिसरात आढळून आलेल्या महिलेच्या संपर्कातील आहेत. नाशिक शहरात आता 9 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्स ठेवावा, मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नाशिक कोरोना क्विक अपडेट
संध्याकाळी 7 वाजता

पॉझिटिव्ह रुग्ण 74
मालेगाव 62, नाशिक शहर 09, नाशिक ग्रामीण 03

- Advertisement -

निगेटिव्ह रुग्ण 577

प्रलंबित रिपोर्ट 180

शनिवारी दाखल झालेले रुग्ण 09
जिल्हा रुग्ण 03, मालेगाव रुग्णालय 06

नाशिक शहरातील पहिल्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

नाशिक शहरातील गोविंदनगरमध्ये पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळून होता. या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याचे शनिवारी दुसरे रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास मिळाले असून ते निगेटिव्ह आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

मालेगावातील 32 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयास शनिवारी सायंकाळी 28 जणांचे रिपोर्ट मिळाले. ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बोगस डॉक्टरकडे उपचार 

अंबड येथील पॉझिटिव्ह महिलेचे सुरुवातीला घराशेजारील एका डॉक्टरकडे उपचार सुरू होते. विशेष म्हणजे तो डॉक्टरच नसल्याची चर्चा सुरू आहे. कथित डॉक्टरच्या पत्नीच्या नावाने लायसन्स असून  ती कधीच क्लिनिकला येत नाही. तरीही, कथित डॉक्टरची प्रॅक्टीस जोरात सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -