घरमहाराष्ट्रनाशिकसप्तशृंगी गड पायथ्याला पिकअप ट्रक उलटला

सप्तशृंगी गड पायथ्याला पिकअप ट्रक उलटला

Subscribe

पिकअप मध्ये ३२ प्रवासी असल्याची प्रथमिक माहिती

सप्तशृंगी गड : नाशिक जिल्ह्यात अपघाताचे सुरू असतांनाच आज सकाळच्या सुमारास दाभाडी येथून सप्तशृंगी गडावर  दर्शनासाठी जाणाऱ्या  पिकअप ट्रक  (एमएच १८ बी. झेड.८१६७) ला चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.मंगळवार देवीचा वार असल्याची  मान्यता असल्याने मंगळवारी सप्तशृंगीरणी हजारो भाविक लीन होत असतात.नांदुरी ते सप्तशृंगगड हे अंतर दहा किलोमीटर असुन सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असताना हा अपघात झाला.

या वाहनात एकूण ३२ प्रवासी होते. यातील २३ जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य प्रशासन तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.जखमींना वणी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल  करण्यात आले आहे. गाडी मालकाचे नाव बंडू गांगुर्डे असून तो दाभाडी येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या अपघताताचे कारण अद्याप अस्पष्ट असून यात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे प्रथमिक वृत्त आहे. दरम्यान मालवाहु वाहनामधे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरलेल्या वाहनाला नांदुरी येथील तपासणी पथकाने सोडलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

अशी आहेत जखमींची नावे 

  • प्रताप माळी
  • दत्तू मोरे
  • रेणुका पवार
  • दिपली पवार
  • दीपक ठाकरे
  • अश्विनी ठाकरे
  • वंदना ठाकरे
  • निर्मला माळी
  • पल्लवी ठाकरे
  • गंगुबाई ठाकरे
  • केशव निकम
  • तुषार ठाकरे
  • सागर गायकवाड
  • छाया गायकवाड
  • आकाश गांगुर्डे
  • रमेश पवार
  • कृष्णा पवार
  • दत्तू सोनवणे
  • पंकज ठाकरे
  • जयश्री ठाकरे
  • पोपट निकम
  • योगेश ठाकरे
  • विशाल ठाकरे
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -