घरक्राइमखून करून झाला होता फरार, गुजरात मध्ये चालवायचा रिक्षा, १३ वर्षांनी सापडला...

खून करून झाला होता फरार, गुजरात मध्ये चालवायचा रिक्षा, १३ वर्षांनी सापडला जाळ्यात

Subscribe

नाशिक : गेल्या १३ वर्षांपासून फरार असलेला एका युवकाच्या हत्येतील आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शनिवारी (दि.२८) सरकारवाडा पोलीस ठाण्यात अटक केली. न्यायालाने खूनाच्या गुन्ह्यात जाहीरनामा प्रसिद्ध करून तो मुदतीत हजर न झाल्याने त्यास फरार घोषित केले होते. निलेश विनायक कोळेकर (वय ३७, रा. पंचवटी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळेकर व त्याच्या साथीदारांनी २००९ मध्ये अज्ञात कारणातून दिनेश कदम याची हत्या केली होती. पंचवटी पोलिसांनी त्याला व साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर कोळेकर याने न्यायालयाकडून जामीन मंजूर होताच पळ काढला होता. तेव्हावपासून तो फरार होता. कोळेकर विरुध्द २०१७ मध्ये जिल्हा सत्र न्यायालाने खूनाच्या गुन्ह्यात जाहीरनामा प्रसिद्ध करून तो मुदतीत न्यायालयात हजर न झाल्याने त्यास फरार घोषित केले होते. त्या अनुषंगाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल होता.

- Advertisement -

शनिवारी (दि. २७) युनिट एकचे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना कोळेकरची माहिती मिळाली. त्यांनी त्याला ताब्यात घेतले. फरार घोषित असल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल असल्याचे त्याचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या सूचनेने सहायक उपनिरीक्षक रविंद्र बागुल, हवालदार नाझीम पठाण, अंमलदार विशाल देवरे, विशाल काठे, आप्पा पानवळ, संजय राठोड, सुरेश माळोदे, शरद सोनवणे यांनी केली.

आरोपी गुजरातमध्ये चालवायचा रिक्षा

 खूनाचा गुन्हा घडल्यानंतर काही दिवसांतच कोळेकर जामीनावर बाहेर आला. त्याला जामीन मंजूर केल्याबरोबरच अटी व शर्थी देण्यात आल्या होत्या. तरी तो हजर झाला नाही. पोलीस त्याचा सहा वर्षांपासून शोध घेत होते. मात्र, तो सापडला नाही. पोलिसांच्या तपासानुसार न्यायालयाने कोळेकरला फरारी घोषित केले होते. तो गुजरात येथे रिक्षा चालवून पोट भरत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याच्यावर गुजरात हद्दीत काही गुन्हे आहेत, का याचाही तपास सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -