घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकर्ज देणार्‍या लोन अ‍ॅप्सपासून सावध रहा; 'अशी' होते फसवणूक

कर्ज देणार्‍या लोन अ‍ॅप्सपासून सावध रहा; ‘अशी’ होते फसवणूक

Subscribe

नाशिक : शहरात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीत वाढ होत असून, लोन अ‍ॅप्सव्दारे फसवणूक व बदनामीचे प्रकारांमध्ये वाढ होत आहे. डाऊनलोड केलेल्या अनोळखी अ‍ॅप्सना मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरीच्या ऍक्सेस देवू नये. धमक्या आल्यास घाबरून न जाता सायबर पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील सहाय्यक प्राध्यापक योगेश हांडगे यांनी केले आहे.

सध्या किरकोळ रकमेचे ऑनलाईन कर्ज देणार्‍या जाहिराती सोशल मीडियावर येत आहेत. गरजू लोकांना लोन देण्यासाठी अनेक अ‍ॅप्स आता प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप्स गरजूंना फक्त आधारकार्डवर किंवा फक्त पॅन कार्डवर कर्ज, विना गॅरंटी कर्ज पाच ते दहा हजारापर्यंत दिले देते. कर्ज देण्यासाठी बँका भरपूर कागदपत्रे मागतात. त्यानंतर दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करावी करून घेतात या प्रक्रियेत बराच वेळ आणि खर्च होतो. त्या तुलनेत या अ‍ॅप्सद्वारे कर्ज मिळवणे सोपे झाले आहे. यात फक्त आपल्या बँकेचे तपशील आणि आधारकार्ड किंवा पॅनकार्ड त्यांना द्यावे लागतो. हे सर्व दिल्यानंतर काही मिनिटातच कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होते. मात्र, येथून फसवणुकीला खरी सुरवात होते. हे कर्ज तुमची समाजात अतोनात बदनामी करणारे ठरेल आणि हे असले कर्ज घेणे म्हणजे आयुष्याशी खेळ ठरू शकतो. थोड्या पैशांसाठी तरूणाई या जाळ्यात अडकत चालली आहे. ऑनलाईन कर्ज नागरिकांनी घेवू नये, असे प्रा. योगेश हांडगे यांनी केले आहे.

अशी होते फसवणूक

  • लोन अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर काही परवानग्या वापरकर्त्यांकडून मागितल्या जातात. वापरकर्ते कुठल्याही गोष्टींची शहनिशा न करता मागितलेल्या सर्व परवानग्या अ‍ॅप्सला देतात. त्या अ‍ॅप्सद्वारे कॉन्टॅक्ट लिस्ट सोबत फोटो, व्हिडीओ आणि लोकेशन्सवर नजर ठेवली जाते. तुम्ही वापरलेला पैसा, केलेले व्यवहार अशा सर्व गोष्टींवर देखील नजर ठेवली जाते.
  • पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले तर प्रोसेसिंग फीस आणि इतर चार्ज लावतात. या कंपन्या आपल्याला केवळ अडीच हजार रुपये देतात. मात्र, परतफेड करतेवेळी आपल्याला सात दिवसात पाच हजार रुपये द्यावे लागतात.
  • सात दिवसात घेतलेले कर्ज फेडायचे असते. परंतु, पाचव्या किंवा सहाव्या दिवसापासूनच अ‍ॅप्सकडून पैसे मागण्याचे सुरु होते. परतफेडीच्या ठरलेल्या मुदतीपेक्षा उशीर झाला तरी प्रत्येक दिवसाचा दंड मोठा असतो. त्यामुळे जी रक्कम कर्ज म्हणून घेतो त्या रकमेपेक्षा व्याजाचा एक हप्ता मोठा असतो. संपूर्ण पैसे परत केले तरीदेखील ते पैसे मागत असतात. पुढे ते तुमच्या मोबाईलमधून तुमच्या जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना तुमचा मॉर्फ केलेले अश्लिल फोटो पाठवत बदनामी करतात.
  • लोन अ‍ॅप्स डाऊनलोड करताना आपल्याकडून कॉन्टॅक्ट आणि मेसेंजरची परवानगी घेतात. त्यामुळे हे अ‍ॅप्स सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट चोरी करतात आणि कॉल घेतला नाही तर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये प्रत्येकाला तुम्ही फ्रॉड असल्याचा मॅसेज जातो. वसुलीसाठी शिवीगाळ आणि धमकी दिली जाते.
  • लोन अ‍ॅप्स वापरकर्त्याचा पर्सनल डेटा चोरून आणि तो विकून भरपूर पैसा कमवला जातो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -