घरमहाराष्ट्रनाशिक‘भाईं’च्या स्वारीला शंभर गाड्यांची सलामी

‘भाईं’च्या स्वारीला शंभर गाड्यांची सलामी

Subscribe

तुरुंगातून सुटल्यानंतरचा प्रकार; तुरुंग पोलिसांनी ताकीद दिल्यानंतर पंटर्सने काढला पाय

वर्दळीच्या रस्त्यावर अचानक शंभरहून वाहनांचा ताफा थांबला. तुरुंगातून भाई कधी बाहेर येतात आणि समर्थकांना कधी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी करतो असे झाले होते, हे दृश्य सिनेमामधील वाटले असले त्याची प्रत्यक्ष अनुभूती नाशिकरांना गुरुवारी आली. निमित्त होते, ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धेश अभंगे (२८) याची शिक्षा भोगून झाल्यानंतर नाशिकरोड कारागृहातील सुटकेचे. गुरुवारी (दि. १) सुटका झाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी समर्थकांनी शंभरहून अधिक वाहने आणून गर्दी केली होती. त्यामुळे जेलरोडची वाहतूक ठप्प झाली होती.

सिद्धेश अभंगे याच्यावर खंडणी उकळणे, खूनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, अमली पदार्थांची तस्करी करण्यासह विविध गुन्हे ठाणे जिल्ह्यातील कोपरी, चितळसर, वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याला आधी ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.

- Advertisement -

एमपीडीए कार्यद्यांतर्गत ठाणे पोलिसांनी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करत नाशिकरोड कारागृहात २ ऑक्टोबर २०१९ रोजी रवानगी केली होती. त्याची गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुटका होणार होती. त्यामुळे ठाण्याहून त्याचे समर्थक शंभरहून अधिक वाहनाने आले होते. त्याची गुरुवारी कारागृहातून सुटका झाली. तो कारागृहातून बाहेर येताच त्याच्याभवती समर्थकांनी गर्दी केल्याने जेलरोडवर वाहतूक ठप्प झाली. हा प्रसंग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीसुद्धा गर्दी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -