घरक्राइम'एसीबी'ची कारवाई; आरोग्य विभागाचा उपसंचालक लाच घेताना ताब्यात

‘एसीबी’ची कारवाई; आरोग्य विभागाचा उपसंचालक लाच घेताना ताब्यात

Subscribe

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. आरोग्य सेवा मंडळाचे प्रशासकीय मुख्याधिकारी गजानन लांजेवार यांना २०हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यारी असलेल्या तक्रारदाराकडून लाच मागितली होती. तक्रारदाराच्या रजा रोखीकरणासाठीचे बील मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. लांजेवार यांना बुधवार (दि.२४) रोजी आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालक कार्यालयात सापळा रचून लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आल आहे.

सविस्तर माहिती अशी की, निवृत्त वैद्यकीय अधिकारी असलेल्या तक्रारदाराला त्याने रजेच्या दिवशीही दिलेल्या सेवेच्या मोहबदल्यात रजा रोखीकरण अंतर्गत मिळणारी रक्कम मिळवायची होती. त्याबाबत तक्रारदाराने आरोग्य सेवा मंडळाकडे रीतसर मागणी केली होती. त्याअनुषंगाने सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली होती. मात्र तरीही रजारोखीकरणांची रक्कम मिळण्यासाठी आरोग्य सेवा मंडळाचे, नाशिक उपसंचालक प्रशासकीय मुख्याधिकारी गजानन लांजेवार यांनी त्यांच्याकडे रक्कमेच प्रकरण मंजूर करून देण्याच्या बदल्यात २० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी मंगळवारी (दि.२३) लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नाशिक येथे धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून बुधवारी (दि.२४) आरोग्य सेवा नाशिक मंडळ, उपसंचालक कार्यालयात सापळा रचला. लांजेवार यांना त्यांच्याच कार्यालयात तक्रारदारकडून लाच स्वीकारत असताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. दरम्यान लांजेवार यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात भ्रष्टचार प्रतिबंध अधिनियम १९८८च्या कलम ७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचसोबत पुढील तपास केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -