घरमहाराष्ट्रनाशिकपिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प

पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प

Subscribe

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली कृषी विधेयकांची होळी

कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पिंपळगावकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. तर, दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी विधेयकांची होळी केली.

या बंदला निफाड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपळगाव बसवंत, कारसूळ येथे बंदला प्रतिसाद मिळाला. पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. पिंपळगाव शहरातही कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

- Advertisement -

कारसूळ, लोणवाडीत कडकडीत

निफाड तालुक्यातील कारसूळ, लोणवाडी येथे भारत बंदला प्रतिसाद लाभला. कारसूळ येथील ज्येष्ठ नागरिक संजय जगताप यांनी सकाळपासूनच ग्रामस्थ व व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी मारक असून, त्यामुळे बळीराजाचे नुकसान होणार आहे. याचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून सदर विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली. या बंदमध्ये शिवसेनेचे कारसूळ शाखा प्रमुख योगेश शंखपाळ, मनोज कडपे, ज्येष्ठ नागरिक संजय जगताप, ज्ञानेश्वर ताकाटे, बाबुराव ताकाटे, संपत कडाळे, अमोल ताकाटे, नीलेश ताकाटे, संदीप सगर, संदीप शंखपाळ, ॠषिकेश ताकाटे आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -