घरताज्या घडामोडीसाल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी कार दरीत ; दाम्पत्य जागीच ठार

साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी कार दरीत ; दाम्पत्य जागीच ठार

Subscribe

सीमावादातून मृतदेह काढण्यात विलंब

बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल चीकारजवळ तवेरा कार दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात मुल्हेर येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तवेरा थेट चिचली दरीत कोसळली. शेकडो फूट खोल दरीत कोसळल्याने वाहनातील दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. रामजीवन शर्मा व पुष्पा शर्मा असे अपघातात मृत दाम्पत्याचे नाव आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणाहून तवेरा गाडी दरीत कोसळली, ते ठिकाण महाराष्ट्र राज्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. तर महाराष्ट्राच्या हद्दीतून कोसळलेली तवेरा कार गुजरात शासनाच्या अहवा पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत गेल्याने या अपघाताची नोंद करण्यासंदर्भात जायखेडा व अहवा पोलिसांत वाद सुरू असल्याचे समजते. दरम्यान, बुधवारी रात्री दहा वाजता झालेल्या अपघातातील शर्मा दाम्पत्याचे मृतदेह गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत काढण्यात आल नव्हते. महाराष्ट्र आणि गुजरात पोलिसांमध्ये सुरु असलेल्या सीमा वादामुळे आणि अत्यंत खोल दरीमुळे मृतदेह काढण्यात अडचणी येत होत्या.

अपघात की आत्महत्या?

उत्तर प्रदेश येथून महाराष्ट्रात मुल्हेर येथे वास्तव्यास आलेल्या शर्मा कुटुंबियांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर शर्मा कुटुंबियांनी आत्महत्या केल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. तर दुसरीकडे अपघात परिसरातील हॉटेलमध्ये जेवण आटोपून घरी परतताना दरीचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांकडून यासंदर्भात तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -