घरमहाराष्ट्रनाशिकबाळासाहेबांची शिवसेनाच आघाडीवर

बाळासाहेबांची शिवसेनाच आघाडीवर

Subscribe

तालुका पदाधिकार्‍यांच्या बैठकीत काशिनाथ मेंगाळांचे प्रतिपादन

इगतपुरी : प्रत्येक जिल्ह्यात संघटना वाढावी यासाठी तालुका पदाधिकारी कार्यकारणीसाठी बैठकांचे आयोजन करण्यात येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना वाढविण्याचे काम करत आहोत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये १५ सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे निवडून आले आहेत. मात्र ठाकरे गटाला चौथ्या नंबरवर समाधान मानावे लागेल आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रत्येकाने सज्ज रहा व बाळासाहेबांची शिवसेनाच आघाडीवर राहील, असे प्रतिपादन सहसंपर्क प्रमुख तथा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी केले.

संपर्कप्रमुख जयंत साठे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना घराघरात जाणार आहे. सरकार आपले असून सर्वसाधारण जनतेची कामे करून मतदारसंघात झंझावात निर्माण करून तळागाळातील कामे करण्याचा मुख्य उद्देश आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर बाळासाहेबांची शिवसेना इगतपुरी तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते यांची पक्षीय कामकाज व कार्यकारिणी संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी संपर्कप्रमुख जयंत साठे, जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, तालुकाप्रमुख संपत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

यावेळी मागासवर्गीय सेल तालुकाप्रमुख बाळू कचरे, तालुका संपर्क प्रमुख पुंडलिक जमधडे, तालुका उपप्रमुख अरुण भागडे, गटप्रमुख भगवान वाघचौरे, राजाराम गाढवे, ज्ञानेश्वर घारे, धनराज म्हसने, विश्वास खातळे, ज्ञानेश्वर जमधडे, मच्छीद्र भले, मारुती आघान, उपगट प्रमुख तानाजी तोकडे, तालुका संघटक जयराम गव्हाणे, साहेबराव बांबळे, अरुण भागडे, उपतालुकाप्रमुख पुंडलिक जमधडे, उपसरपंच कैलास गायकर, जयराम गव्हाणे, उपतालुका प्रमुख विठलं आघान, दतु बांबळे, गणप्रमुख तानाजी गाढवे, लहानु वाजे आदी पदाधिकार्‍यांची निवड यावेळी करण्यात आली.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -