घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात यंदाही संक्रांत पक्ष्यांसाठी जीवघेणी

नाशकात यंदाही संक्रांत पक्ष्यांसाठी जीवघेणी

Subscribe

शहरात शुक्रवारी ५ तर, शनिवारी ९ पक्षी जखमी

नाशिक : यंदाची मकरसंक्रांत पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरली असून, शहरात नायलॉन मांजामुळे शुक्रवारी (दि.१४) दोन कबुतरांसह घार, घुबड आणि कावळा जखमी झाले. तर. शनिवारी (दि.१५) ३ कबुतरे, घुबड, आयबीस, बगळा असे ९ पक्षी जखमी झाले. या पक्ष्यांना वेळेत उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले आहे. पतंगप्रेमींनी नायलॉय मांजाचा वापर टाळून पक्ष्यांना जीवदान द्यावे, असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.

गतवर्षी वर्षभरात नाशिक शहरात १७३ पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी झाले होते. नाशिक शहर पोलीस व सामाजिक संस्थांनी जनजागृती सुरू केल्याने शहरात यंदा कमी पक्षी जखमी झाले आहेत. पोलिसांनी अनेक विक्रेत्यांना अटक करत त्यांच्या ताब्यात नायलॉन मांजा जप्त केल्याने अनेक पक्ष्यांचे जीव वाचले आहेत. जखमी पक्ष्यांना वेळेत उपचार मिळण्यासाठी इको एको फाउंडेशनचे सदस्य, पशुवैद्यकीय अधिकारी प्रयत्नशील आहेत. इको एको फाउंडेशनचे १५ सदस्य शहरात जखमी पक्ष्यांना शोधून त्यांना उपचारार्थ अशोकस्तंभ येथील पशूवैद्यकीय रुग्णालयात दाखल करत आहेत. तर पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर व ३० विद्यार्थी तत्काळ जखमी पक्ष्यांवर उपचार करत आहेत.

- Advertisement -

दोन दिवसांत तब्बल शहरात १४ पक्षी जखमी झाले. त्यापैकी १३ पक्ष्यांना जीवदान देण्यात यश आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या एका घुबडाचा मृत्यू झाला. पाथर्डी फाटा येथे एक कबूतर नायलॉन मांजात अडकले होते. ही बाब यादव नाना मोकळ यांच्या लक्षात आली. त्यांच्यासह प्रशांत सूर्यवंशी आणि इतर सहकार्‍यांनी तात्काळ कबुतराची मांजातून सुटका करत जीवदान दिले. त्याच्या जखमेवर हळद लावून पाणी पाजून सोडून दिले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -