घरमहाराष्ट्रनाशिकबस स्थानक गजबजले, नाशिक विभागात धावताय ५५० बस

बस स्थानक गजबजले, नाशिक विभागात धावताय ५५० बस

Subscribe

आगामी काळात बसेसची संख्या ६००-६५० पर्यंत नेणार : विभागीय नियंत्रक मुकुंद कुंवर

नाशिक : संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट पहावयास मिळाला होते. मात्र, आता स्थिती पूर्वपदावर आली असून विविध मार्गांवर बसेस सुरू करण्यात आलेल्या आहे. यामुळे प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानक गजबजून गेले आहे. अधिकधिक उत्पन्न वाढवण्याबाबत प्रयत्न करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे.

शासकीय विलीनीकरणाची मागणी करत एस.टी. कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांहून अधिक काळ संप पुकारला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बहुतांश कर्मचारी हजर झाले आहेत. यामुळे विभागात सद्यस्थितीला ५५० हून अधिक बसेस धावत आहे. आगामी काळात बसेसची संख्या ६००-६५० पर्यंत नेणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक मुकुंद कुंवर यांनी दिली. यामुळे ठप्प झालेली बससेवा सुरळीत झाली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अल्प वेतनामुळे कर्मचाऱ्यांनी शासकीय विलीनीकरणाची मागणी करत संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. आगामी सुट्यांचा कालावधी लक्षात घेता बसेसची संख्या ६५० पर्यंत नेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -