घरक्राइमकोयता हातात घेऊन 'कोणीच माझे काहीच वाकड करू शकत नाही' म्हणत, अल्पवयीन...

कोयता हातात घेऊन ‘कोणीच माझे काहीच वाकड करू शकत नाही’ म्हणत, अल्पवयीन युवकाचा भर रस्त्यात धिंगाणा

Subscribe

नाशिक : कोणी आहे का मायकालाल माझ्यासमोर येईल, कोण समोर आले तर कापून टाकीन, दोन जणांवर हत्याराने वार केले तरी पोलिसांनी माझे काही वाकडे केले नाही, असे म्हणत मोठ्यामोठ्या आरडाओरडा करुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक धारदार कोयता जप्त केला आहे. ही घटना सोमवारी (दि.१३) ठक्कर बाजार परिसरात घडली. वेदांत संजय चाळगे (वय १८, रा. राहुलनगर, तिडके कॉलनी, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दहशत निर्माण करण्यासाठी संशयित वेदांत बेसावध व्यक्तीवर चॉपरने हल्ला करून पळून जायचा. त्याने एका व्यक्तीने चॉपरने हल्ला करुन फरार झाला होता. त्यानंतर त्याने शनिवारी (दि.११) पुन्हा दुसर्‍या व्यक्तीवर चॉपरने हल्ला करुन फरार झाला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार प्रशांत मरकड संशयित आरोपी वेदांत चाळगे हा सोमवारी (दि.१३) ठक्कर बाजार परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र बागूल व पथकाने त्यास ठक्कर बाजारजवळील किशोर सुधारालयसमोरुन ताब्यास घेतले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक धारदार कोयता जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक प्रशांत मरकट यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेदांत चाळगेविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील कारवाईसाठी त्यास गुन्हे शाखेने सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

- Advertisement -
बालवयातच भाईगिरीचे आकर्षण

 संशयित आरोपी वेदांत चाळगे हा अवघा १८ वर्षांचा आहे. त्याला भाईगिरीचे आकर्षण असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याने शहरात दहशत निर्माण करण्यासाठी दोन अनोळखी व्यक्तींवर हल्ले करुन पळून गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, वेदांत सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील वडापाव विक्री करतात तर आई घरकाम करते. त्याच्या घरची बेताची परिस्थिती असताना वेदांतला आजूबाजूच्या वातावरणामुळे भाईगिरीचे आकर्षण निर्माण झाले. किशोरवयीन मुलांचे भवितव्य चांगले घडण्यासाठी समाजानेसुद्धा परिसरातील मुलांवर लक्ष ठेवून त्यांना चांगल्या-वाईट गोष्टींचे परिणामी सांगितले पाहिजेत. पोलीस गुन्हेगारी आटोक्यात आणतील पण अल्पवयीन मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी समाजाचीसुद्धा आहे, त्यासाठी नागरिकांनी सजग राहून आपल्या मुलांसह त्याच्या संगतीत असलेल्या मुलांशी संवाद साधला पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -