घरमहाराष्ट्रनाशिकसीबीएस चौक ते टिळकवाडी सिग्नल रस्ता आजपासून बंद

सीबीएस चौक ते टिळकवाडी सिग्नल रस्ता आजपासून बंद

Subscribe

स्मार्ट सिटीअंतर्गत वाहतूक मार्गात बदल; वाहतूक कोंडीसह पार्किंगचाही मनस्ताप होणार

स्मार्ट नाशिक अंतर्गत त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ मार्गावरील दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम सुरू असून, सीबीएस चौकाचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी टिळकवाडी सिग्नल ते सीबीएस हा रस्ता काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. नाशिककरांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी अधिसूचनेद्वारे केले आहे.

शरणपूर रोडसाठी हे आहेत पर्यायी मार्ग

शालिमारकडून सीबीएसमार्गे टिळकवाडीकडे जाणार्‍या सर्व वाहनांसाठी हा रस्ता बंद असल्याने, शालिमारकडून खडकाळी सिग्नल, जिल्हा परिषद, मोडक सिग्नल या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच, शालिमारमार्गे सीबीएस, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभमार्गे इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करता येईल. टिळकवाडी सिग्नलकडून शालिमार, तसेच पंचवटी, गंगापूररोडमार्गे जाणार्‍या वाहनचालकांना टिळकवाडी सिग्नल, राणे डेअरी, मॅरेथॉन चौकामार्गे पुढे जाता येईल. मुंबईनाका व द्वारका सर्कलकडे जाणार्‍या वाहनांना टिळकवाडी सिग्नल, जलतरण, मोडक सिग्नलमार्गे त्र्यंबक रोडवरून पुढे जाता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -