घरमहाराष्ट्रनाशिकपूर ओसरला : गोदाकाठी आता स्वच्छता मोहीम

पूर ओसरला : गोदाकाठी आता स्वच्छता मोहीम

Subscribe

गाळ, पानवेलींसह कचरा काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

नाशिक – गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे रामकुंड परिसरातील मंदिरात व चौकात पुराचे पानी आल्याने मोठ्या प्रमाणात गाळ, पानवेली व तत्सम कचरा अडकला.

बुधवारी पुराचे पानी कमी झाल्यावर पालिका आरोग्य विभागाचे डॉ. आवेश पलोड यांच्या आदेशानुसार गुरुवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वछता निरीक्षक संजय दराडे, स्वछता निरीक्षक उदय वसावे यांच्या उपस्थितीत होळकर पूल ते टाळकुटेश्वर परिसरातील अडकलेली पानवेली व तत्सम कचरा (अंदाजे ३ टन )काढण्यात आला. तसेच मंदिर व चौकातील सर्व गाळ प्रेशर टँकर व अग्निशामक विभागाच्या वाहनाच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला. या स्वछता मोहिमेत वॉटर ग्रेस कंपनीचे ४३ कर्मचारी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -