घरउत्तर महाराष्ट्र'देव द्या, देवपण घ्या' उपक्रमांतर्गत साडेसहा हजार गणेशमूर्ती संकलन

‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमांतर्गत साडेसहा हजार गणेशमूर्ती संकलन

Subscribe

नाशिक : सुविचार मंच आणि विद्यार्थी कृती समितीच्यावतीने देव द्या, देवपण घ्या उपक्रमांत नाशिककरांनी प्रतिसाद देत पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला हातभार लावला. या उपक्रमांतर्गत सुमारे साडेसहा हजार गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. गोदापार्क येथील चोपडा लॉन्सजवळ येथे हा उपक्रम राबविण्यात आल्याचे अध्यक्ष आकाश पगार यांनी सांगितले.

गोदावरी नदीला प्रदुषणापासुन वाचविण्यासाठी १३ वर्षांपूर्वी मुर्ती व निर्माल्य दान करण्यासाठीचा देव द्या, देवपण घ्या हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. यानिमित्ताने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या लाखो मुर्तींचे दान नाशिककरांकडुन करण्यात येत आहे. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून देव द्या देवपण घ्या या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. गणेशभक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील यावेळी उपलब्ध करुन देण्यात आली होती. पिवळ्या रंगाचे आकर्षक कुर्ता घातलेले कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. या मुर्ती अत्यंत भावपूर्ण वातावरणात सुपूर्द करण्यात येत होत्या.

- Advertisement -

जनजागृती कामी आली

नाशिकच्या लाखो गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला. दीड, पाच व सात दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात आल्या होत्या. पिवळ्या रंगाचे आकर्षक कुर्ता घातलेले कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. या मूर्ती अत्यंत भावपूर्ण वातावरणात सुपूर्द करण्यात येत होत्या.

प्रदूषणाला आळा

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. गणेशोत्सवातील दहा दिवस सुविचार मंच व विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार तसेच आवाहन करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -