घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात दंगलीचा कट

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात दंगलीचा कट

Subscribe

माजी आमदार शेख रशीद यांचा आरोप; राजकीय कारस्थान

नाशिक : मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात हिंदु-मुस्लिम दंगली घडवण्याचा कट राजकीय पुढार्‍यांकडून शिजवला जात असल्याचा धक्कादायक आरोप मालेगावचे माजी आमदार शेख रशीद यांनी केला आहे.
देशात आधीच हिजाबवरून मोठा वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत मुस्लीम वस्तीत असलेल्या उर्दू घरावर भगवा ध्वज तर राष्ट्रीय एकात्मता चौकास मुस्कान खानचे नाव द्यायचे किंवा संवेदनशील स्थळी हिरवा झेंडा लावायचा, असा प्रयत्न काही राजकीय लोकांतर्फे होत असल्याचा शेख यांचा आरोप आहे. कर्नाटकात झालेल्या हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभर पोहोचले आहे. यावरून महाराष्ट्रभरही आंदोलने झाली. कर्नाटकात हिजाब घालून घोषणा देणारी मुस्कान याच वादामुळे देशभर पोहोचली आहे.

महापालिका निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर काहीच मुद्दे नसल्याने राजकीय लाभ मिळावा, यासाठी हिंदू-मुस्लीम समाजात वाद निर्माण करून शहराला अशांत करत आगीत झोकण्याचा प्रयत्न काही लोकांतर्फे सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. त्यामुळे पुन्हा खळबळ माजली आहे. हिजाबवरून मालेगावतही सर्वात मोठे आंदोलन उभा राहिल्याचे दिसून आले. देशात सध्या यावरून दोन गट पडले आहे. काहींचा हिजाबला विरोधत आहे. तर काही जणांकडून हिजाबचे समर्थन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षही यात भूमिका घेताना दिसून आले. राज्यातल्या अनेक पक्षातील महिलांनी हिजाबसाठी आंदोलनही केली आहेत. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

पोलीस अलर्ट मोडवर

शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय लोकांतर्फे स्वत:च्या स्वार्थासाठी सुरू असल्याचा आरोप देखील शेख यांनी केला आहे. तसेच शहराचे वातावरण खराब व्हावे,अशी परिस्थिती तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मालेगावत पोलीस प्रशासनही आता अलर्ट मोडवर आले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -