घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीने खरेदी केलेली रेंज रोव्हर जॉन अब्राहिमची

नाशिकच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीने खरेदी केलेली रेंज रोव्हर जॉन अब्राहिमची

Subscribe

दुहेरी खुनानंतर ‘एन्जॉय ग्रुप’द्वारे फुल टू धमाल

नाशिक : मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित यांचा खून केल्यानंतर मुख्य संशयित आरोपी राहुल जगताप याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी थंड डोक्याने नियोजन केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, राहुलने खरेदी केलेली महागडी रेंज रोव्हर कार बॉलिवूड स्टार जॉन अब्राहिमची असल्याचे समजते.

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित याच्या खूनप्रकरणात पोलिसांनी बुधवारी (दि.१६) मुख्य संशयित आरोपी राहुल जगताप याला अटक केली. गुरुवारी (दि.१७) संशयित राहुल जगताप याच्या गोपाळ पार्क (जुनी पंडित कॉलनी) आणि उषाकिरण सोसायटीतील भाडेकरारावर घेतलेल्या बंगल्याची झडती घेतली. या बंगल्यातून पोलिसांनी कापडणीस यांचे चेकबूक, एटीएम कार्ड आणि महत्त्वाचे कागदपत्र जप्त केले. दोघांचे मृतदेह फेकण्यासाठी जी स्विफ्ट कार वापरली ती फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने तपासणीसाठी ताब्यात घेतली आहे. न्यायालयाने त्यास २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस त्याची दररोज चौकशी करत असून, त्याच्याविरोधातील पुरावे गोळा करत आहेत.

- Advertisement -

परिणामी, पोलीस तपासात दररोज धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. त्याचा एन्जॉय नावाचा ग्रुप आहे. त्याने एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून मित्र परिवारासह हॉटेल व कर्मचार्‍यांना पार्ट्या दिल्या आहेत. या पार्ट्यांवर त्याने भरमसाठ पैसे खर्च केले आहेत.

मुख्य संशयित आरोपी राहुल जगताप हा उषाकिरण सोसायटीत भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होता. तेथे त्याने ऑफिस थाटले होते. या फ्लॅटमधून लपवलेले कार्ड, कागदपत्रे जप्त केले असून, गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. शिवाय, कारचे फॉरेन्सिक टीम परीक्षण केले असून, ती पुन्हा परीक्षणासाठी पाठवण्यात आली आहे. ती गाडी गोव्यातील असल्याची शक्यता आहे. त्याने एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून तब्बल दोन महिने पार्ट्या, सहली या माध्यमातून फुल टू धमाल केली. शिवाय, त्याने हॉटेल व कपड्याच्या दुकानातील कर्मचार्‍यांनी सरप्राईज ट्रिप दिली असल्याचे उघडकीस आले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -