घरमहाराष्ट्रनाशिकदरेगावच्या खव्याला आजही पसंती; दीडशे वर्षांची परंपरा टिकून

दरेगावच्या खव्याला आजही पसंती; दीडशे वर्षांची परंपरा टिकून

Subscribe

प्रवीण दोशी । सप्तशृंगगड

प्रत्येक गावाला एक परंपरा, स्वतःची वेगळी ओळख असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने होणार्‍या बदलात परंपरा विशेष ओळख टिकवून ठेवणे अवघड होऊन बसले आहे. मात्र सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव येथील ग्रामस्थांनी दीडशे वर्षांपूर्वीची खवा तयार करण्याची परंपरा आजही टिकून ठेवली आहे. गडावर येणार्‍या राज्यभरातील भाविकांकडून या खव्याला पसंती दिली जात आहे. कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता स्वादिष्ट खवा बनविणार्‍या दरेगाववासियांच्या खव्याने सर्वत्र प्रसिद्धी मिळविली आहे.

- Advertisement -

दिंडोरी व कळवण तालुक्याच्या सीमेलगत असणारे दरेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून खवा बनविण्याची परंपरा आहे. गावातील गवळी समाजाचा हा प्रमुख व्यवसाय आहे. या खव्याला कळवण सप्तशृंग गडासह नाशिक जिल्ह्यात मागणी आहे. पेढे व विविध प्रकारच्या मिठाईमध्ये खव्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याने दुकानदारही येथील खव्याला पसंती देतात. गाईच्या ५ लिटर दुधापासून तर म्हशीच्या ४ लिटर दुधापासून एक किलो खवा तयार करण्यात येतो. दूध तापवून आटवत त्याचा खवा तयार केला जातो. पूर्वी दूध आटविण्यासाठी लाकडी भट्टीचा वापर केला जायचा. आता मात्र गॅसवर दूध आटवले जाते. अपवादात्मक स्थितीत आजही काही घटक पारंपारिक पद्धतीचा वापर करत असल्याची माहिती देण्यात आली.

खव्याच्या प्रतवारीनुसार २०० रुपये किलोला दर मिळतो. वास्तविक दुधाच्या दराच्या तुलनेत हा दर खवा तयार करणार्‍यांना परवडणारा नाही, मात्र पारंपारिक पर्यायी व्यवसाय म्हणून याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यापाठीमागे आहे. जुलै ते डिसेंबर दरम्यान गाई व म्हशीसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्याने या काळात दूध उत्पादनात वाढ होत असल्याने खवा तयार करण्याचे सर्वाधिक प्रमाण या कालावधीत असते. तासन्तास भट्टीसमोर बसून दर्जेदार खवा तयार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. कळवण तालुक्यातील दरेगाव, मोहनदरी, नांदुरी, कातळगाव या परिसरात खवा तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. मात्र दरेगावच्या खव्याच्या तुलनेत इतरांचे प्रमाण नगण्य आहे. सागाच्या व पळसाच्या पानांमधे किरकोळ विक्रेते एक किलोपासून ५ किलोपर्यंत खवा ठेवण्यात येतो.

- Advertisement -

अर्धा ते एक किलो आकारमानाचे खव्याचे गोळे असलेली ही पाने भांड्यात ठेवून गावोगावी त्याची विक्री केली जाते. किरकोळ विक्रेत्याची पद्धत तर घाऊक विक्रेते मोठ्या भांडयांमधून खवा घेऊन त्याची इच्छीत ठिकाणी वाहतूक करून विक्री करतात पळसाच्या पानात व सागाच्या पानात ठेवलेल्या खव्याचा सुगंध दुरवर पोहचत असल्याने खव्याचा आस्वाद घेण्याचा मोह खवय्यांना दरम्यान शंभर म्हशी ज्यांचे घरी त्यांचीच मिठाई शुद्ध खरी याची प्रचीती दरेगाव वासियांच्या खवा तयार करण्याच्या प्रक्रियेतून येत आहे. पूर्वी संपूर्ण गाव हा व्यवसाय करायचे. मात्र आता २० ते २५ कुटुंब हा व्यवसाय करतात. त्या कुटुंबांनी आजही दरेगावच्या खव्याची औळख जपून ठेवल्याची माहिती खवा उत्पादक सोमनाथ गवळी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -