घरक्राइमACB Report : लाचखोरीत राज्यात नाशिक अव्वल; 8 महिन्यांत 104 गुन्ह्यांत 153...

ACB Report : लाचखोरीत राज्यात नाशिक अव्वल; 8 महिन्यांत 104 गुन्ह्यांत 153 लाचखोर जाळ्यात

Subscribe

मागील आठ महिन्यांत 517 गुन्ह्यांमध्ये तब्बल 717 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) अव्वल आहे.

मुंबई : सर्वसामान्यांची प्रलंबित कामे झटपट व्हावी म्हणून गावपातळीपासून तर थेट मंत्रालयापर्यंत सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, सर्वसामान्यांची कामे करुन देण्यासाठी पैशांसह इतर भेटवस्तू स्वीकारणाऱ्यांचा जणू सुळसुळाट झाला आहे. यंदाही राज्यात लाचखोरीत वाढ झाली असून, मागील आठ महिन्यांत 517 गुन्ह्यांमध्ये तब्बल 717 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) अव्वल असून, पुणे दुसऱ्या स्थानावर असल्याची स्थिती एसीबीच्या (ACB) संकेतस्थळावर असलेल्या माहितीतून पुढे येत आहे.

राज्यात लाचखोरीत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. लाचखोर अगदी पैशांसह भेटवस्तुंचीही मागणी करत असल्याचे अनेक कारवायातून दिसून येते. तर जमवलेली ‘माया’ ही फ्लॅट, शेती आणि दागिण्यात गुंतवली जात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतून पुढे आहे. यंदाच्या आठ महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाया केल्या असून, आतापर्यंत 517 लाचखोरीचे गुन्हे दाखल करून 717 लाचखोरांना कोठडीची हवा खायाला पाठविले आहे.

- Advertisement -

अपसंपदेच्या 6 गुन्ह्यात 11 जण अटकेत

वास्तविक असलेल्या उत्पन्नापेक्षाही जवळ असलेली मालमत्ता या ना त्या मार्गातून जमविणाऱ्यांचीही संख्या राज्यात काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. 2023 च्या जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत एसीबीने अपसंपदेची 6 गुन्हे दाखल करुन 11 लाचखोरांना अटक केली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू असून, त्यांच्या मालमत्तेवर टाच ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्यावरून गुन्हा दाखल होण्याची शक्यता

- Advertisement -

लाचखोरीत नाशिक अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेले पुणे यंदा मात्र लाचखोरीत राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याची स्थिती आहे. पहिल्या क्रमांकावर नाशिक असून, नाशिकमध्ये मागील आठ महिन्यांत 104 गुन्ह्यांमध्ये 153 लाचखोर तर पुण्यामधअये 92 गुन्ह्यांमध्ये 130 लाचखोर तर नागपूर-50, ठाणे-61,मुंबई-23,अमरावती-55, औरंगाबाद-89 तर नांदेडमध्ये 43 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : “या नराधमाला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे”, चित्रा वाघ यांचा संताप

नेहमीप्रमाणे महसूल विभागच आघाडीवर

राज्यात एसीबीने 517 लाचखोरीचे गुन्हे दाखल केले असतानाच या लाचखोरीमध्ये नेहमीप्रमाणेच महसूल विभाग आघाडीवर असल्याची स्थिती आहे. या विभागात आतापर्यंत 137 कारवाया करण्यात आल्या असून, दुसऱ्या स्थानावर पोलीस असून, आतापर्यंत पोलीस विभागात 93 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -