घरमहाराष्ट्रनाशिकओझर विमानतळाला जटायू नाव देण्याची मागणी

ओझर विमानतळाला जटायू नाव देण्याची मागणी

Subscribe

विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा नेहमीच चर्चेत

नाशिक : ओझर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहीला आहे. आता ओझर विमानतळाला जटायू नाव देण्यात यावे अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी केली आहे.

नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यासाठी बर्‍याच वर्षांपासून मागणी होत आहे. तर काही संघटनांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. विविध महापुरूषांचे नाव देण्यावरून चर्चेत असलेल्या ओझर विमानतळाला जटायू नाव देण्याची मागणी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी केली आहे. याबाबत बोलतांना ते म्हणाले की, रामायणात जटायू या गरुड पक्षाचा संदर्भ मिळतो.

- Advertisement -

रावण सीतेला पळवून लंकेत घेऊन जात असतांना जटायूने सीतेला रावणापासून सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या रावणाचे त्याचे पंख छाटले. त्यामुळे तो जमिनीवर पडला. सीतेचा शोध घेत राम आणि लक्ष्मण तिथे पोहचले तेव्हा त्यांना सीतेच्या अपहरणाची संपूर्ण माहिती जटायूकडूनच मिळाली होती. त्यामुळे रामायणात जटायूचे योगदान मोठे आहे. नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे ओझर विमानतळाला जटायू नाव देण्यात यावे अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार, राज्य सरकार व उड्डाण मंत्रालयाला नम्रपणे प्रतिपादन करू इच्छितो की, नाशिक विमानतळाला जटायू एअरपोर्ट या नावाने संबोधले जावे. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी कुंभनगरी आहे आणि जटायू यांचे रामायणात अमुल्य असे योगदान आहे. त्यामळे हे एअरपोर्ट जटायू या नावाने संबोधले जावे असे मी सर्व संत समाज, हिंदुत्ववादी संघटना आणि नाशिककरांच्यावतीने विनंती करतो. – महंत अनिकेत शास्त्री देशपांडे

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -