घरमहाराष्ट्रनाशिकमहाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी दिनकर पाटील?; शरद पवार गटाकडून चाचपणी?

महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी दिनकर पाटील?; शरद पवार गटाकडून चाचपणी?

Subscribe

नाशिक : अजित पवार यांनी केलेल्या राजकीय भूकंपाचे परिणाम थेट नाशिकच्या राजकारणावर झाला आहे. विशेषत: नाशिक लोकसभा मतदार संघाचे गणित तीन पक्ष एकत्र आल्याने बदलले आहे. या तीनही पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी राष्ट्रवादीचे शरद पवारांकडून छगन भुजबळांना शहर देण्यासाठी चांगल्या उमेदवाराचा शोध जिल्ह्यात सुरू झाला आहे. त्यासाठी महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्याही नावाचा विचार सुरू झाल्याचे कळते.

लोकसभा निवडणुकांचा बिगुल कधी वाजेल हे सांगता येत नाही. मात्र इच्छुकांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. सद्यस्थितीत ही जागा हेमंत गोडसे यांच्य रुपाने शिवसेनेकडे म्हणजेच सध्याच्या शिंदे गटाकडे आहे. शिवसेनेत फुट पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने सर्वच चित्र बदलल्याचे पहायला मिळाले. भाजपनेही नाशिक लोकसभेसाठी संपर्कप्रमुख नेमल्याने ही जागा भाजपला सुटणार की शिंदे सेनेला याबाबत संभ्रम असतांनाच आता सत्ताकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एन्ट्री’ केली. त्यामुळे आता राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. उत्तर प्रदेशनंतर भाजपने महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे एक- एक जागेवर लक्ष केंद्रित केले आहे.

- Advertisement -

आता राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्याने त्यांनाही जागा सोडाव्या लागणार आहेत. सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणात उध्दव ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये आहे. गोडसे हे शिंदे गटात आणि तर छगन भुजबळ हे अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी झाल्याने तुर्तास महाविकास आघाडीकडे आश्वासक चेहरा नाही. ही जागा शिवसेनेकडे असली तरी, भाजपकडून दिनकर पाटील यांनी जिल्ह्यात प्रचारालाही सुरूवात केली आहे. शिवसेना (शिंदे गट), भाजप राष्ट्रवादी यांनी एकत्रित निवडणूक लढवल्यास या जागेवर स्वत: भुजबळ निवडणूक लढवू शकतात किंवा ती पुन्हा शिंदे गटाला दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत भाजप इच्छुकांचा हिरमोड होऊ शकतो. निवडणुकीसाठी तन, मन आणि धनाने तयारी केलेल्या भाजपमधील नाराज इच्छुकाकडेही महाविकास आघाडीचे लक्ष असेले. महाविकास आघाडीकडून अनेक नावे समोर येत असली तरी, माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. तेे गेली दोन वर्ष मतदारसंघात फिरत आहेत. गेल्या दीड वर्षात त्यांनी संपूर्ण मतदारसंघ(पान २)

या आहेत जमेच्या बाजू

  • नाशिक लोकसभेत गेली दोन वर्ष वाढवलेला जनसंपर्क
  • मतदारसंघाच्या विकास कामांसाठी घेतलेला पुढकार
  • ४७३ ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्यासोबत पत्रव्यवहार करत कामांचे प्रस्ताव मागवले
  • ग्रामविकास मंत्री महाजन यांच्याकडे पाठपुरावा करत अडीच कोटी रुपयांचा निधी या गावांना मंजूर केला
  • महानुभाव पंथाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या माध्यमातून भक्तपरिवारामध्ये असलेला मोठा जनसंपर्क
  • प्रभागातील विकास कामातून दाखवली विकासाची चुणूक शहरातील प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा
  • मतदारसंघात असलेल्या नातेगोत्यांमुळे मिळणारा पाठींबा गोडसे विरोधकांकडून मिळणारा पाठींबा

यापूर्वीही भुजबळांना दिले होते आव्हान

शरद पवार यांनी पहिले लक्ष्य छगन भुजबळ यांना केले आहे. त्यासाठी बंडानंतर त्यांनी पहिली सभा भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात घेतली. लोकसभा निवडणुकीतही भुजबळांच्या शब्दाला सत्ताधारी गोटात महत्व असेल. त्यामुळे भुजबळांना तुल्यबळ लढत देऊ शकेल अशा उमेदवाराचा शोध शरद पवारांकडून घेतला जात आहे. दिनकर पाटील यांनी यापूर्वी बसपाकडून निवडणूक लढवतांना भुजबळांना घाम फोडला होता. त्यामुळे दिनकर पाटलांनाच उमेदवारी देण्याची खेळी शरद पवार यांच्या गटाकडून सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -