घरमहाराष्ट्रनाशिक३ सेवेतून बडतर्फ तर ८ ग्रामसेवकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई; झेडपी सीईओ मित्तल यांची...

३ सेवेतून बडतर्फ तर ८ ग्रामसेवकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई; झेडपी सीईओ मित्तल यांची धडक कारवाई

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार, अनधिकृत गैरहजर, अभिलेखे उपलब्ध करून न देणे व आनुषंगिक दोषारोपांमुळे जून महिन्यात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दि. ८ जून २०२३ रोजी संबंधित सर्व ग्रामसेवक यांची सुनावणी घेतली. त्यानुसार एकुण ११ ग्रामसेवकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असुन यात २ ग्रामसेवक यांना त्यांचे म्हणणे मान्य करुन त्यांची विभागीय चौकशी बंद करण्यात आली. तर ३ ग्रामसेवकांच्या फेरचौकशीचे आदेश देण्यात आले आहे अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

हेमराज गावित हे निळगव्हाण, ता. मालेगांव येथे कार्यरत असतांना सन २०१८ पासुन गैरहजर असणे, सतिष बुधाजी मोरे, हे कौळाणे, ता. मालेगांव येथे कार्यरत असतांना मासिक व पाक्षिक सभांना सतत गैरहजर असणे, ग्रामपंचायत कार्यालयाचा आढावा न देणे, मुख्यालयी हजर न राहणे, व कार्यालयीन आदेशाचे पालन न करणे या कारणांमुळे बडतर्फ कारवाईस पात्र ठरले तर अतिष अभिमन शेवाळे हे कंत्राटी ग्रामसेवक सन २०२० पासून कंत्राटी ग्रामसेवक ग्रामपंचायत बोराळे येथे कार्यरत असतांना दि. 9 मे रोजी रु. 15 हजार लाचेची मागणी करुन ती स्विकारल्याप्रकरणी त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार दि.9 मे रोजी रोजी वडनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच निलेशसिंग गोविंदसिंग चव्हाण हे वासाळी, तालुका इगतपुरी येथे कार्यरत असतांना रेखांकित धनादेशाद्वारे रक्कम खर्च न करता रु.24,45,450/- दर्शनी धनादेशाद्वारे खर्च करणे व इतर आरोपांमुळे त्यांना मुळ वेतनावर आणणे, सुभाष हरी गायकवाड हे टाकेहर्ष, ता. त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असतांना सन 2000 या वर्षातील मृत्युची नोंद 21 वर्षानंतर नियमबाह्यपणे व अधिकार नसतांना करणे, यामुळे त्यांना मुळ वेतनावर आणणे, जयदिप उत्तम ठाकरे हे ग्रामपंचायत दुगांव, ता. चांदवड येथे कार्यरत असतांना सन 2015-16 मध्ये ग्रामपंचायतीचे दप्तर 6 वर्षांनंतरही उपलब्ध करुन न देणे, यामुळे त्यांच्या 3 वार्षिक वेतनवाढी कायमस्वरूपी बंद करण्यात आली.

परशराम रायाजी फडवळ हे चिचोंडी, ता. येवला येथे कार्यरत असताना दप्तर उपलब्ध करून न देणे, त्यांच्या निवृत्तीवेतनातून 10% रक्कम 3 वर्षासाठी कपात करणे, शशिकांत जावजी बेडसे हे वडगांव पंगु, ता. सिन्नर येथे कार्यरत असतांना ग्रामपंचायत नमुना नं. 01 ते 33 अद्यावत न करणे व पीएफएमएस प्रणालीवर डीजीटल सिग्नेचर इंटीग्रेट न करणे, माधव बुधाजी सुर्यवंशी हे कुरुंगवाडी, ता. इगतपुरी येथे कार्यरत असतांना मानव विकास कार्यक्रम यात रु. 4,01,000/- नियमबाहय खर्च करुन पुन्हा ग्रामसभा कोष खात्यावर भरलेे म्हणून देवेंद्र सुदामराव सोनवणे हे पळासदरे, ता. मालेगांव येथे कार्यरत असतांना दि. 16 जून 2019 ते 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत अनधिकृत गैरहजर असल्याने त्यांच्या 3 वार्षिक वेतनवाढी कायमस्वरूपी बंद केल्या.

- Advertisement -

नरेंद्र सखाराम शिरसाठ हे ग्रामपंचायत म्हाळसाकोरे, ता. निफाड येथे कार्यरत असतांना स्वतःच्या नावाने धनादेश काढली म्हणून वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्यात आली. तसेच विजय गोपाळ अहिरे हे टाकेहर्ष, ता. त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असतांना त्यांच्याविरुध्द दोषारोप सिध्द झाले आहेत, तथापि, त्यांचा खुलासा मान्य करून त्यांना शिक्षा न करता त्यांची विभागीय चौकशी बंद करण्यात आली आहे उल्हास बसवराज कोळी यांची विभागीय चौकशी बंद करण्यात आली आहे.

अमोल गोविंद धात्रक हे मळगांव, ता. नांदगांव येथे कार्यरत असतांना रु. 4,97,000/- ची प्रमाणके लेखापरीक्षणास उपलब्ध करून न देणे सुरेश छगन पवार हे उम्रद, ता. पेठ येथे कार्यरत असतांना त्यांनी एकूण रु. 63,45,084/- रकमेची प्रमाणके, अंदाजपत्रके न देणे, ज्ञानोबा बाबुराव रणेर हे ग्रामपंचायत सोनारी शिवडे ता. सिन्नर येथे कार्यरत असतांना सन 2020-21 आणि 2021-22 या वर्षांची दप्तर तपासणी गट विकास अधिकारी, सिन्नर यांना निर्देशित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -