घरमहाराष्ट्रनाशिकमंगलमैत्री: १८ एचआयव्ही बाधितांच्या जुळल्या रेशीमगाठी

मंगलमैत्री: १८ एचआयव्ही बाधितांच्या जुळल्या रेशीमगाठी

Subscribe

राज्यातील ४५० विवाहेच्छुक वधू-वरांची परिचय मेळाव्यास उपस्थिती

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारशैली असल्यास कुठल्याही प्रसंगाने ओढावलेल्या नैराश्यावर तसेच दुर्धर आजारावर मात करून आनंदी जीवन जगता येऊ शकते. सर्वसामान्यांप्रमाणे संसार फुलवून जीवनाचा आनंद लुटता येणे शक्य होते, असा संदेश मंगल मैत्री मेळाव्यातून समाजापर्यंत गेला. या मेळाव्यात एचआयव्ही सहजीवन जगणारे विवाहेच्छुक ४५० युवक-युवती एकत्र आले. त्यातील अठरा जोडप्यांनी एकमेकांच्या साथीने आयुष्य जगण्याचा संकल्प करीत विवाहास तयारी दर्शविली.

चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात चाकण येथील महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स, यश फाऊंडेशन, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, नेटवर्क ऑफ पॉझिटीव्ह पीपल्स अ‍ॅण्ड चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एच.आय.व्ही, (एन.पी.सी.), एन.एम.पी.प्लस, विहानप्रकल्प मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगल मैत्री मेळावा घेण्यात आला. यात एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्‍या विवाहइच्छुक वधु-वरांनी सहकुटूंब उपस्थिती दर्शविली. राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, नागपूर, हिंगोली यासह राज्याबाहेरील गुजरात, तेलंगणा येथील सुमारे चारशे पन्नास जणांनी सहभाग नोंदविला. यावेळी तब्बल १८ मुला-मुलींच्या रेशीमगाठी जुळल्या. तर आणखी १५

- Advertisement -

कुटूंबांमध्ये विवाहाची बोलणी सुरु आहे.

यावेळी बोलताना चाकण येथील महिंद्रा व्हेईकल फन्युफॅक्चरर्स उद्योग संस्थेचे प्रकल्प प्रमुख नचिकेत कोडकणी यांनी सांगितले की, एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्‍यांची मुलांना एचआयव्हीची बाधा नसते ही बाब अतिशय चळवळीला बळकटी देणारी आहे. सामाजिक जाणिवेच्या भुमिकेतून महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स उद्योग संस्था गेली काही वर्षे एच.आय.व्ही. साठी जनजागृती व पूनर्वसनाचे विविध ठिकाणी कार्यक्रम राबवित आहे. सुरूवातीला अत्पल्प प्रतिसाद मिळात होता. आज इच्छूक एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्‍यांसाठी वधू-वर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. हे मोठे यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा म्हणाले, एचआयव्ही बाधितांनी प्रथमत: आपल्या मनातील न्यूनगंड दूर करावा. दु:खाला आणि त्रासाला मनातून हद्दपार करावे. आज विवाहासाठी जे वधू-वर इच्छुक आहेत त्यांनी मनापासून नवजीवनाला सुरूवात करावी, यापुढे तणावग्रस्त राहता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर कमला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील समवेत चाकण येथील महिंद्रा उद्योग संस्थेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मार्शल थॉमस, सहायक व्यवस्थापक सनी लोपेज उपस्थित होते. यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रस्तावना केली. तर प्रकल्प समन्वयक चंदा थेटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. निजी साजन यांनी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -