घरक्राइम'शिंगाडा तलाव परिसरात पोलीस चौकी उभारा'; 'त्या' दंगलसदृश्य घटनेच्या पार्श्वभूमीवर मागणी

‘शिंगाडा तलाव परिसरात पोलीस चौकी उभारा’; ‘त्या’ दंगलसदृश्य घटनेच्या पार्श्वभूमीवर मागणी

Subscribe

नाशिक : शिंगाडा तलाव परिसरात काही दिवसांपूर्वी व्यापारी आणि कर्मचार्‍यांमधील वादामुळे दोन गट आमने सामने आले. त्यामुळे तुंबड हाणामारी होऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलिस आयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या दालनात झालेल्या बैठकीत व्यापार्‍यांनी कर्मचारी संघटनेच्या अरेरावी बद्दल तक्रारी केल्या. तसेच परिसरात पोलीस चौकी उभारण्याबाबत आमदार फरांदे यांनी मागणी केली. परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता पोलीस गस्त वाढविण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

आमदार देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेऊन शिंगाडा तलाव येथील व्यापार्‍यांच्या समस्यांबाबत उपायुक्त किरण चव्हाण यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित व्यापारी वर्गाने समस्या मांडल्या. शिंगाडा तलाव परिसरात व्यापार करत असताना येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी युनियन करून दहशत निर्माण केली असल्याची बाब त्यांनी उपायुक्त किरण चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली.

- Advertisement -

या कर्मचार्‍यांनी दुकान मालकांनी कोणाला नोकरीवर घ्यायचे याबाबत देखील निर्देश देण्यास सुरुवात केली असल्यामुळे व्यापारी व कर्मचारी यांच्या संघर्ष निर्माण झालेला होता. आमदार देवयानी फरांदे यांनी शिंगाडा तलाव येथील व्यापारी हे त्यांच्या दुकानाचे मालक असून दुकानात कोणता व्यक्तीस नोकरीला ठेवायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट करताना याबाबत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच व्यापार्‍यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलीस विभागाने देखील कारवाई करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करताना या ठिकाणची गस्त वाढवण्याची मागणी केली.

या भागात कायमस्वरूपी शांतता प्रस्तावित व्हावी यासाठी शिंगाडा तलाव भागात पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी देखील आमदार फरांदे यांनी केली. याबाबत बोलताना उपायुक्त किरण चव्हाण यांनी व्यापारी पूर्णतः स्वतंत्र व संरक्षित असून त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा पोलीस त्यांना निश्चित संरक्षण देतील असे आश्वासन दिले. तसेच या भागातील पोलीस ग्रस्त वाढवण्यात येणार असून ते स्वत: देखील आठवड्यातून एक दिवस या भागात गस्त घालणार आहे असे आश्वासन दिले. यावेळी शिंगाडा तलाव परिसरातील व्यापार्‍यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -