घरमहाराष्ट्रनाशिकवासन समूहाच्या 'एव्हरी'चा शुभारंभ

वासन समूहाच्या ‘एव्हरी’चा शुभारंभ

Subscribe

नाशिक वाहन क्षेत्रात सहा दशकांपासून कार्यरत असलेल्या शहरातील वासन समूहाने आणलेल्या एव्हरी या अनोख्या संकल्पनेचा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ झाला

नाशिक वाहन क्षेत्रात सहा दशकांपासून कार्यरत असलेल्या शहरातील वासन समूहाने आणलेल्या एव्हरी या अनोख्या संकल्पनेचा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ झाला. प्रत्येक तरुण-तरुणीचे दुचाकी बाळगण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, हा या संकल्पनेमागील हेतू आहे.

प्रत्येक कंपनी, प्रत्येक मॉडेल आणि विविध किंमतीचे पर्याय असलेल्या नव्यासारख्या (प्री वोण्ड) दुचाकींना ६ महिन्यांची वॉरंटी आणि २ मोफत सर्व्हिसेस मिळणार आहेत. याशिवाय फायनान्सचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विजय वासन यांनी पत्रकार परिषदेत दिली. बजेटमध्ये बसणार्‍या ४०० पेक्षा अधिक दुचाकींमधून आवडीची गाडी निवडण्याची संधी या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिककरांना उपलब्ध करून दिल्याची माहिती वासन एव्हरीचे उपाध्यक्ष भूपिंदरसिंग मल्होत्रा यांनी दिली. शहरासह जिल्हाभरात या संकल्पनेचा विस्तार करण्याचा मानस वासन यांनी व्यक्त केला. ज्यांना अधिक पैसे गुंतवून नवीन दुचाकी घेणे शक्य नाही, अशा लाखो ग्राहकांना या संकल्पनेचा लाभ होणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -