घरमहाराष्ट्रनाशिकशिवजयंती मिरवणुकीत डीजेला फाटा; पारंपारिक वाद्यांना परवानगी

शिवजयंती मिरवणुकीत डीजेला फाटा; पारंपारिक वाद्यांना परवानगी

Subscribe

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नाशिक शहरातील सार्वजनिक मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करुन साजरी करावी. मिरवणुकीत पारंपारिक वाद्या परवानगी देण्यात आली असून, डीजेचा वापर केला जाणार नाही. कोणत्याही धार्मिक व राजकीय तेढ निर्माण होवू नये, याची खबरदारी घेतली जाणार आहे. मंडळातर्फे उभारण्यात येणारे देखावे व होर्डिग्जवरील मजकुराची पडताडणी केल्यानंतरच परवानगी दिली जाणार आहे. प्रत्येक मंडळाची सीसीटीव्ही व स्वंयसेवक नियुक्त करावे, अशा सूचना पोलीस आयुक्त अकुंश शिंदे यांनी दिल्या.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१४) दुपारी १ वाजता पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज बाम सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, चंद्रकांत खांडवी, महापालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले की, शिवजयंती शांततेत साजरी करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याचीही प्रत्येक मंडळाने दक्षता घ्यावी. शहरात दोन मुख्य मिरवणुकांसह उपनगरीय परिसरात मिरवणुका निघतात. त्यासाठी लागणार्‍या परवानग्या संबंधित मंडळांनी काढून घ्याव्यात. यावेळी शहरातील शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्यांसह सार्वजनिक मंडळांचे सागर देशमुख, रवी गायकवाड, गणेश बर्वे, पद्माकर पाटील, मामा राजवाडे, अविनाश शिंदे, अ‍ॅड. अक्षय कलंत्री, गणेश आवणकर, गजू घोडके आदी उपस्थित होते.

महापालिकेची एक खिडकी योजना

सार्वजनिक मंडळांच्या परवानगीसाठी मनपाची एक खिडकी योजना आहे. ही योजना ऑनलाईन असल्याने त्यावरून मंडळांना ऑनलाईन परवानग्या मिळतात. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर एनओसीसुध्दा मिळते. महापालिकेकडे १९४ मंडळांचे अर्ज आले असून,त्यावर प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन अडचणी येत असेल तर, महापालिकेच्या संकेतस्थळावर नोडल अधिकार्‍यांच्या संपर्क क्रमांक असून त्यांना संपर्क साधता येऊ शकेल अशी माहिती मनपाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.

- Advertisement -
काय म्हणाले पोलीस आयुक्त

१९४ शिवजयंती मंडळांचे मिरवणूक परवानगीसाठी अर्ज आले आहेत. अर्जांची पडताळणी करुन परवानगी दिली जाईल. मुख्य मिरवणुकीत २५ मंडळे सहभागी होणार आहेत. पारंपारिक वाद्यांना परवानगी देण्यात आली आहे. मिरवणुकीत डीजेचा वापर केला जाणार नाही. त्यास मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. परवानगीशिवाय होर्डिंग्ज लावता येणार नाही. होर्डिग्जवरील मजकूराची पोलीस आणि महापालिका तपासणी करणार आहे. सामाजिक काम करणारे मंडळांच्या कामांची निवड करत पारितोषिके दिले जाणार आहेत. या पुरस्काराला काय नाव द्यायचे, याबाबत आयुक्तालयाकडे ईमेलच्या माध्यमातून कळवावे, स्मार्ट सिटी व पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेर्‍याव्दारे वॉच राहणार आहे. मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वापर करणे गरजेचे आहे.

शिवजयंती मंडळांची मागणी

शिवजयंतीदिवशी ड्राय डे असावा. पालखी सोहळ्यासाठी सर्व विभागातून परवानगी मिळावी. मांस, मच्छी विक्रीवर बंदी घालण्यात यावी. सोहळ्यात महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने महिला पोलिसांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करावी. सिटी बसच्या वाहतूक मार्गात बदल करावा. स्मार्ट सिटीची मिरवणूक मार्गावर सुरु असलेली कामे शिवजयंती दिवशी बंद ठेवावीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -