घरमहाराष्ट्रनाशिकभुगर्भशास्त्रज्ञ करणार त्र्यंबकमधील धोकादायक गावांचे सर्वेक्षण

भुगर्भशास्त्रज्ञ करणार त्र्यंबकमधील धोकादायक गावांचे सर्वेक्षण

Subscribe

नाशिक : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनही अर्लट मोडवर आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धोकादायक गावांचा भूगर्भ शास्त्र विभागाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तालुक्यातील सुमारे दहा ते पंधरा तालुक्यांच्या बाबतीत संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलणार आहे.

आजही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तालुक्यातील सुपलीची मेट या गावात 60 ते 65 घरे असून येथे 400 ते 500 नागरिक रहिवास करतात. ब्रह्मगिरी पर्वताच्या वरच्या टप्य्यात गाव असल्याने पर्वताच्या मोठं मोठ्या चिरा नजरेस पडतात. आजवर ज्या पर्वताच्या आश्रयाने नागरिक निर्धास्तपणे राहत होते. आज त्याच पर्वताची भीती वाटते आहे. कधी दरड कोसळेल, याचा नेम नसल्याने ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगत आहेत. मागील दोन वर्षापासून ब्रह्मगिरी पर्वत परिसरात अवैध उत्खनन सर्रास सुरु असल्याने डोंगराला हादरे बसतात आणि त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ब्रह्मगिरीच्या पोटाला सुपलीची मेट गंगाधर मेट, जांबाची मेट, पठाराची वाडी, विनायक खिंड, महादरवाजा मेट या वस्ती आहेत. या गावांना धोका निर्माण होऊ शकतो याकरीता आता प्रशासन सज्ज झाले आहे. या सर्व गावांना आजपासून प्रांताधिकारी स्वतः पाहणी करणार आहेत.

तालुक्यातील गावांना आजपासून भेटी देणार आहे. काही गावांतील नागरिकांना घरे बांधण्यासाठी वनविभागाने 1.82 आर हेक्टर जागा देऊ केली आहे. मात्र नागरिकांचा या ठिकाणी स्थलांतरास विरोध आहे. मात्र इर्शाळवाडीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागेल. त्यादृष्टीने आम्ही सर्व ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत. : रविंद्र ठाकरे, प्रांताधिकारी, त्र्यंबकेश्वर मधील धोकादायक गावे

- Advertisement -

पाच तालुके केंद्रस्थानी 

जिल्हयातील पेठ, त्रयंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, सुरगाणा या पाच तालुक्यांकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून संबधित तहसीलदारांना धोकादायक ठिकाणांचा अहवाल मागविण्यात आलाआहे तसेच या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याबाबतही अहवाल मागविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -