घरताज्या घडामोडीदारू पिऊन 'समृद्धी'वर गाडी चालवताय मग सावधान! सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

दारू पिऊन ‘समृद्धी’वर गाडी चालवताय मग सावधान! सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Subscribe

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. अनेक प्रवाशांना वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे आणि वाहन चालवताना आलेल्या अडथळ्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. अनेक प्रवाशांना वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे आणि वाहन चालवताना आलेल्या अडथळ्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. त्यानुसार, आता समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची ‘अल्कोहोल टेस्ट’ केली जाणार आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली. (alcohol test of drivers on samriddhi highways decision taken by minister dada bhuse vvp96)

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर दादा भूसे यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “समृद्धी महामार्गावर आता लवकरच वाहन चालकांची अल्कोहल टेस्ट होणार असून, अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. तसेच काटेकोरपणे वाहतूक नियमांचे पालन करण्यासंबंधी पाऊल उचलली जाणार आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांमागे मानवी चुका आहेत. तर आजवर समृद्धी महामार्गावर 32 लाख वाहने धावली असून, त्यामुळे याकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे”, असे दादा भुसे म्हणाले.

- Advertisement -

अल्कोहोल टेस्ट करण्याचा निर्णय

समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील सिंदखेड राजा जवळ काही दिवसांपूर्वी एका खाजगी बसचा अपघात झाला होता. या भीषण अपघातात 25 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर बुलढाणा जिल्ह्यातील बस अपघातात चालकाने मद्य प्राशन केल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची अल्कोहोल टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली आहे.

  • मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
  • समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
  • या अपघाताची वेगवेगळी कारणे देखील समोर आली आहे.
  • समृद्धी महामार्ग घाई गडबडीत सुरु करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
  • या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पाऊलं उचलली आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -