घरमहाराष्ट्रनाशिकआधी गोडसे, नंतर भुजबळ

आधी गोडसे, नंतर भुजबळ

Subscribe

नाशिक लोकसभा मतदारसंघातील बॅलेट युनिटवर (ईव्हीएम) मशिनवर शिवसेना, भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना स्थान मिळाले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील बॅलेट युनिटवर (ईव्हीएम) मशिनवर शिवसेना, भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना स्थान मिळाले आहे.

मतदान करताना बॅलेट युनिटवरील अनुक्रमांकही उमेदवारांना प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. हा क्रमांक अद्याक्षराच्या अनुक्रमानुसार ठरवला जातो. त्यामध्येही राष्ट्रीय आणि प्रादेशिक नोंदणीकृत व आयोगाची मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांचे क्रमांक आधी ठरवले जातात. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांना आणि नंतर अपक्षांना स्थान मिळते. उमेदवाराने अर्ज दाखल करताना ज्या पद्धतीने नाव दिले असेल, त्यातील पहिल्या अक्षराचा निकष अनुक्रमांक लावण्यासाठी ठरवले जातो. नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, बहुजन समाज पक्ष (बसप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या तीनही पक्षाच्या उमेदवारांची नावे मतदान यंत्रावर अगोदर आहेत. राज्यस्तरीय पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीत चुरस निर्माण करणारे अपक्ष उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे अकराव्या क्रमांकावर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार पाचव्या स्थानी आहेत. एका यंत्रावर १५ उमेदवार आणि ’नोटा’चा पर्याय अशी १६ नावे बसतात.

- Advertisement -

नाशिकमध्ये १८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्र (बॅलेट युनिट) वापरावी लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ’ईव्हीएम’ आणि ’व्हीव्हीपॅट’ यंत्राचा वापर केला जाणार आहे. यामध्ये ’ईव्हीएम’वर उमेदवाराचा अनुक्रमांक, त्याचे नाव, पक्षाचे नाव, चिन्ह देण्यात येते. या वर्षीपासून उमेदवाराचा फोटोही बॅलेट युनिटवर असणार आहे. हे बॅलेट युनिट कंट्रोल युनिटला जोडण्यात येते.

दिंडोरीत महाले तिसर्‍या, डॉ. पवार चौथ्या स्थानी

दिंडोरी मतदारसंघातही मतदान यंत्रावर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक जाधव यांनी पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे, तर माकपचे जीवा पांडू गावित दुसर्‍या, राष्ट्रवादीचे धनराज महाले तिसर्‍या, तर भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -