घरमहाराष्ट्रनाशिकदेवीभक्तांच्या बसला अपघात; ३१ जखमी

देवीभक्तांच्या बसला अपघात; ३१ जखमी

Subscribe

देवळा तालुक्यातील खुंटेवाडी गावाजवळ सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेऊन घराकडे परतणारी बस खुंटेवाडीजवळच्या कर्ला नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात ३१ भाविक जखमी झाले.

देवळा तालुक्यातील खुंटेवाडी गावाजवळ सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेऊन घराकडे परतणारी बस खुंटेवाडीजवळच्या कर्ला नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात ३१ भाविक जखमी झाले. ३ जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे हलवले आहे.

जळगाव आगाराची नांदुरी गड-यावल बस (एमएच-१४-बीटी-१६०४) सप्तशृंगी गडावरील दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांना घेऊन जात असताना तालुक्यातील खुंटेवाडी गावाजवळील कर्ला नाल्यात कोसळली. यात चालक व वाहक यांच्यासह ३१ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये चालक आर. पी. मोरे, वाहक आर. टी. कोळी, तसेच प्रवाशी समाधान धनगर, सुनीता पाटील, भूषण पाटील, अनिता पाटील, निंबा पाटील, सुरेखा पाटील, सुनंदा पाटील, प्रल्हाद पाटील, दिलीप खैरनार, कार्तिकेश पाटील, गंगाराम पाटील, रेखाबाई पाटील, भैरवी पाटील, विजूबाई पाटील, सरलाबाई पाटील, नंदाबाई पाटील, अरुणा धनगर, सोनल पाटील, प्रमिला महाजन, पंकज वानखेडे, सुनील धनगर, राजू वानखेडे, भटू पाटील, गणेश भिल, प्रकाश पाटील, संगीता बचीभाऊ, शांताबाई चितरुमे, बेबीबाई चितरुमे, वैष्णवी पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण भिल आदींचा समावेश असून, त्यांच्यावर देवळा ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची मदत

बसचा अपघात झाला त्यावेळेस संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. त्यांच्यासमोरच अपघात झाल्याने स्वतः भामरे यांनी जखमींना बाहेर काढले व सोबत असलेल्या गाडीमधून जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी धुळे भाजपध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक मनोज मोरे, प्रदीप करपे, संजय वाल्हे, भिकन वराडे, सुनील बैसाने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -