घरमहाराष्ट्रनाशिकव्हेज मंच्युरीयनचे ५० रुपये मागितल्याने टोळक्याचा दुकानात राडा

व्हेज मंच्युरीयनचे ५० रुपये मागितल्याने टोळक्याचा दुकानात राडा

Subscribe

दुकानमालकास मारहाण, १० हजार, सोन्याची चेन हिसकावली

नाशिक : व्हेज मंच्युरीयनचे ५० रुपये मागितल्याने टोळक्याने दुकानात तोडफोड करत दुकानमालकास बेदम मारहाण करत ९ हजार ७०० रुपये व सोन्याची चेन हिसकावल्याची घटना रविवारी (दि.२६) रात्री १० वाजता नांदूर नाका ते जेल रोडदरम्यान घडली. याप्रकरणी कुणाल कैलास वाघ यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नांदूरनाका येथील संशयित पद्माकर राजेंद्र विसपुते, आकाश राजू धोत्रे, सनी राजू धोत्रे, राहुल शाम क्षत्रीय यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कुणाल वाघ व संशयित चौघेजण एकमेकांच्या ओळखीचे आहे. वाघ यांचे नांदूर नाक्याजवळ चायनीजचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाण रविवारी रात्री १० वाजता दुकान बंद करत होते. त्यावेळी पद्माकर विसपुते व आकाश धोत्रे हे दुकानात आले. दोघांनी वाघ यांच्याकडे व्हेज मंच्युरीयनची मागणी केली. त्यानुसार वाघ यांनी त्यांना व्हेज मंच्युरीयन दिले. ते संपल्यावर ते दुकानातून बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याने वाघ यांनी मंच्युरीयनचे ५० रुपये मागितले. राग अनावर झाल्याने दोघांनी वाघ यांना शिवीगाळ केली.

- Advertisement -

दोघांनी सनी धोत्रे व राहुल क्षत्रीय यांना बोलावून घेत चौघांनी संगनमताने वाघ यांच्याशी वाद घातला. राहुल क्षत्रीय याने बियरची बॉटल वाघ यांच्या डोक्यात मारत दुकानात तोडफोड केली. संशयितांनी दुकानाच्या गल्ल्यातील ९ हजार ७०० रुपये काढून घेत वाघ यांना बेदम मारहाण करत सोन्याची चेन हिसकावली. त्यानंतर चौघे पळून गेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -