घरमहाराष्ट्रनाशिकबीएसएनएलचे इंदिरानगर एक्स्चेंज डिस्कनेक्ट

बीएसएनएलचे इंदिरानगर एक्स्चेंज डिस्कनेक्ट

Subscribe

वीजबिलाच्या थकबाकीमुळे ओढवली नामुष्की

महावितरण कंपनीने बीएसएनएलच्या इंदिरानगर टेलिफोन एक्सचेंजचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने परिसरातील शेकडो दूरध्वनी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. वीजबील न भरल्याने इतरांना कनेक्ट करणार्‍या ’बीएसएनएल’वरच ’डिस्कनेक्ट’ होण्याची नामुष्की ओढावली आहे.

इंदिरानगर टेलिफोन एक्स्चेंजबाहेर उपमंडल अभियंत्याच्या नावाने विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा जाहीर फलकही लावण्यात आला आहे. ६ ऑगस्ट २०१९ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी वीजबिलाच्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. त्यामुळे या टेलिफोन एक्स्चेंजमधून दिली जाणारी सुविधा-सेवा, तक्रारींचे निराकरण आदीवर परिणाम झाला आहे. आठवडाभर पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी बीएसएनएलच्या केबल्स खराब होऊन दूरध्वनी सेवा कोलमडली आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून झालेल्या या कारवाईमुळे प्रामाणिक ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

- Advertisement -

ग्राहकांना आवाहन

इंदिरानगर टेलिफोन एक्स्चेंजबाहेर लावण्यात आलेल्या फलकाद्वारे ग्राहकांनी आपल्या तक्रारी १८००३४५१५०० या टोल-फ्री क्रमांकावर नोंदवून ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -