घरमहाराष्ट्रनाशिकउंबरठाणच्या जंगलात खैर तस्करी

उंबरठाणच्या जंगलात खैर तस्करी

Subscribe

रस्त्यालगत असलेले खैराचे झाड चोरट्यांनी तोडून रातोरात लांबविले

सुरगाणा तालुक्यातील गुजरात सिमावर्ती भागातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील बर्डा, चिंचमाळ, उंबरपाडा, पिंपळसोंड, सोनगीर, पांगारणे, उदमाळ, रांजुने, दरापाडा, केळीपाडा, हडकाईचोंड, वडपाडा, चिंचले हा भाग गुजरातच्या राखीव जंगलास लागून असल्याने साग, खैराची झाडे असल्याने पाच ते सात वर्षांपूर्वी या भागातील सागवानाची चोरटी तोड करून अत्यंत कमी दरात विकले. या भागात आता सागवानाची झाडे जंगलात दुर्मिळ झाली आहेत.

दोन दिवसांपूर्वी बर्डा, चिंचमाळ, उंबरपाडा, पिंपळसोंड, सोनगीर या भागात खैर या मौल्यवान लाकडाची चोरटी तोड होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती.रात्रीच्या सुमारास उंबरपाडा, पिंपळसोंड, तिवसाची माळी येथून रस्त्यालगत असलेले एक खैराचे झाड चोरट्यांनी तोडून रातोरात लांबविले. तर दोन झाडे तोडून ठेवलेली आढळून आली आहेत. खैराची तस्करी करून सोनगीर या गावी खैराची लाकडे विकत घेणारा दलाल असल्याचे दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. वनविभागाने त्याचा शोध घेऊन मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वीच गुजरात राज्यातील जहागीर या गावातील एका सागवान तस्कराला जेरबंद केले होते.

- Advertisement -

परंतु त्यांना सोडल्यावर काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता. असाच हा चोर-शिपायाचा खेळ वनविभाग व लाकूड तस्कर यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून पाठशिवणीचा जणू खेळच सुरु झाला आहे. मात्र वनविभागाला कायमस्वरुपी चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळत नाही.गुप्त माहिती मिळताच उंबरठाण वनपरिक्षेत्रातील वनरक्षक हरी चव्हाण, तुषार भोये, अक्षय पाडवी, शेवंती गायकवाड, पुंडलिक राऊत, वनमजूर कामडी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तोडलेल्या झाडांची पाहणी केली आहे. पुढील तपास वनविभागा अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -