घरमहाराष्ट्रनाशिकपर्रिकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विधिवत विसर्जन

पर्रिकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विधिवत विसर्जन

Subscribe

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अस्थींचे भाजपाचे प्रदेश कार्यालयीन चिटणीस मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले.

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अस्थींचे भाजपाचे प्रदेश कार्यालयीन चिटणीस मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले. मनोहर पर्रिकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थींचे रामकुंड येथे विसर्जन करण्यात येणार असे जाहीर झाल्यानंतर त्यांचा अस्थी कलश घेऊन मुकुंद कुलकर्णी नाशिकमध्ये आले.

विधिवत पूजा झाल्यानंतर त्यांच्या हस्ते रामकुंडात पर्रिकर यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी आणि प्रतिक शुक्ल यांनी पौरोहित्य केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, भाजपा महानगर अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उत्तमराव उगले, देवदत्त जोशी, नगरसेविका स्वाती भामरे, अनिल भालेराव, महेश सदावर्ते उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -