घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक विमानतळ लवकरच हज टर्मिनलच्या यादीत

नाशिक विमानतळ लवकरच हज टर्मिनलच्या यादीत

Subscribe

खासदार गोडसेंचा राज्य सरकारासह केंद्र सरकारकडे पाठपुरावा

हज यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्राचे मुख्य सेंटर म्हणून नाशिक येथे मिनी हाऊस व्हावे, तसेच मुबंई ऐवजी नाशिक येथून हज येथे जाणार्‍या भाविकांना विमानसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश व्हावा याकरीता खासदार हेमंत गोडसे सातत्याने पाठपुरावा करत असून नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश व्हावा यासाठीची विशेष शिफारस नुकतीच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी नवाब मलिक यांनी केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहारमंत्री मुक्तार नक्वी यांच्याकडे केली आहे.

मुस्लिम बांधवांसाठी हज यात्रा ही एक पवित्र यात्रा आहे. हज यात्रेला जाण्यासाठी प्रत्येक मुस्लिम बांधव प्रयत्नशील असतो. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यातून दरवर्षी १२ ते १५ हजार मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जात असतात. यासाठीची प्रक्रिया राज्य शासनाने जरी ऑनलाईन केली असली तरी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी हज भाविकांना मुंबई येथे तीन ते चार वेळा जावे लागते. कागदोपत्रांची पुतर्ता झाल्यानंतर भाविकांना मुंबई विमानतळावरुन हज यात्रेसाठी रवाना व्हावे लागते. यात पैसे आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने हज भाविकांची मोठी कुचंबना होत आहे. याची दखल घेत नाशिक येथे मिनी हज हाऊस व्हावे आणि नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी खा. गोडसे यांनी गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारासह केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा सुरु केला आहे. दरम्यान खासदार गोडसे यांनी दिल्लीत अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुक्तार नक्वी यांची भेट घेत हज टर्मिनल यादीत समावेशाची मागणी केली.

- Advertisement -

Hemant godase igatpuriउत्तर महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे १० ते १५ हजार मुस्लिम बांधव हजला जात असतात. कागदोपत्रांची पूतर्ता झाल्यानंतर भाविकांना मुंबई विमानतळावरुन हज यात्रेसाठी रवाना व्हावे लागते. यात पैसे आणि वेळाचा अपव्यय होतो. त्यामुळे नाशिकमध्येच हज सेंटर सुरू करून नाशिक विमानतळाहून विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुक्तार नक्वी यांच्याकडे केली आहे. – खासदार हेमंत गोडसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -