घरक्राइमगणेशोत्सवात जुगारबंदीचा नाशिक पॅटर्न, पिठाच्या गिरणीत 'तीनपत्ती'

गणेशोत्सवात जुगारबंदीचा नाशिक पॅटर्न, पिठाच्या गिरणीत ‘तीनपत्ती’

Subscribe

नाशिक : समाजप्रबोधनाच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोत्सव जुगारविरहीत साजरा करण्यासाठी नाशिक शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुंबई नाका परिसरातील फ्लोअर मिलमध्ये छापा टाकला. या छाप्यात पथकाने ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून पथकाने जुगाराचे साहित्य साधने व ६२ हजार ३०० रुपये जप्त केले.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरामध्ये गणेशोत्सवामध्ये काही लोक अवैधपणे धंदे करतात व मोठया प्रमाणात जुगार खेळतात व खेळवितात, अशा व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकने तपास सुरु केला. पोलीस नाईक विशाल काठे यांना रविवारी (दि.२४) अवैध जुगार अड्ड्याची माहिती मिळाली. गणेशोत्सवादरम्यान मैथिली धाम को-हौसिंग सोसायटीच्या बाजूला असलेल्या सिता फ्लोअर मिल या ठिकाणी संशयित गगन शंकर विधाते व संदीप धनाजी विधाते (दोघे रा. नाशिक) हे गिरणीच्या घरामध्ये काही व्यक्तींना ५२ पानी पत्त्याचे कॅटवर तीनपत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची बातमी पोलिसांना मिळाली.

- Advertisement -

ही बाब पोलीस नाईक विशाल काठे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार म्हसदे, नाजिम पठाण, जनार्दन सोनवणे, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, राजेश राठोड व समाधान पवार यांनी छापा टाकला. या छाप्यात गगन शंकर विधाते (सर्वजण रा. नाशिक), संदीप धनाजी विधाते, सुदर्शन दत्तू सोनार, तैसिफ इब्राहिम शेख, भास्कर अशोक वाडगावकर, प्रफुल्ल प्रकाश पहाडी, अल्लाउद्दीन रफीक शेख, सागर राजेंद्र ताजणे, रमेश हिरामण बंजारा, रवींद्र सोमनाथ वाघ, जैरुउद्दीन सफीउद्दीन कुरेशी, संदीप ईश्वर सूर्यवंशी, ऋषीकेश संतोष जोरवेकर, संजू किशन कृपलानी, किरण बाजीराव साठे हे आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी ५२ पानी पत्त्याचे कॅटवर तिनपत्ती नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना जुगाराची साहित्य साधने व रोख रुपये ६२ हजार ३०० रुपयांचे मुद्देमालासह मिळून आले.

पथकाने त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, नाजिम पठाण, योगीराज गायकवाड, पोलीस नाईक विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, राजेश राठोड, समाधान पवार यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -