घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटीत अपघात; चालक ठार, तिघे गंभीर

पंचवटीत अपघात; चालक ठार, तिघे गंभीर

Subscribe

अमृतधामकडून प्रवाशांना घरी सोडायला जात असताना त्रिकोणी बंगल्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास झाला अपघात

अमृतधाम चौफुलीवरून हिरावाडीच्या दिशेने प्रवाशांना घरी सोडण्यासाठी जात असलेल्या खासगी प्रवाशी कारला झालेल्या अपघातात चालक रोहित राजेश बागडे (वय ३०, रा. कोणार्कनगर, पंचवटी) जागीच ठार झाली. शुक्रवारी (१२ जुलै) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बागडे हा इंडिगो गाडीने (एमएच. १५, बी. एक्स ८२३५) प्रवाशांना घेऊन जात होता. ही गाडी रस्त्याकडेला असलेल्या झाडाला जोरदार आदळून बाजुला गेली. त्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील प्रवाशी असलेली एक महिला व दोन मुलांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -