घरमहाराष्ट्रनाशिकपोलिसांचा दणका; सराईत गुंड साजनची रवानगी सेंट्रल जेलमध्ये

पोलिसांचा दणका; सराईत गुंड साजनची रवानगी सेंट्रल जेलमध्ये

Subscribe

सातपूर एमआयडीसीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या जावेद ऊर्फ साजन सल्लाउद्दीन अन्सारी याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करत पोलिसांनी त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांविरोधात शहर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत सातपूर एमआयडीसीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या जावेद ऊर्फ साजन सल्लाउद्दीन अन्सारी याच्याविरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती) कायद्यान्वये कारवाई करत पोलिसांनी त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

सातपूरच्या अशोकनगरातील साजनच्या वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढले आहेत. साजन सल्लाउद्दीन अन्सारी याच्यावर सातपूर, गंगापूर व सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, घातक हत्यारानी ईच्छापूर्वक जबर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, रात्रीच्या वेळेस चोरटे ग्रह अतिक्रमण किंवा घरफोडी, घातक हत्याराने ईच्छापुर्वक दुखापत करणे, चोरी करणे, आगळीक करणे, विनयभंग, लैंगिक प्रकार व छळ, महिलांचा पाठलाग, शांतता भंग, अपमान करणे, धमक्या, जमावबंदी आदेशाचा व हद्दपारीच्या आदेशाचा भंग करणे असे १३ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये फौजदारी कारवाई झालेली आहे. त्यानंतरही त्याची गुंडगिरी सुरूच राहिल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, शहराच्या विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आणखी १० ते १२ गुंड पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -