घरक्राइमपंचवटीतून पल्सर चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

पंचवटीतून पल्सर चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

नाशिक शहरातून पल्सर दुचाकी चोरणार्‍या भामट्याला पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि.२९) अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून जेरबंद केले. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पंचवटी पोलीस त्याच्या मागावर होते. रोहित उर्फ रोहिदास कचरू पानसरे (वय २२, रा. सुभद्र नगर, शिंगणापूर, कोपरगाव, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

दिंडोरी रोडवरील तारवालानगर येथील शिवशक्ती संकुलातील रहिवासी धनंजय कुलकर्णी यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमधून जून २०२० मध्ये पल्सर (एमएच १५ एफएक्स ८९३६) चोरी गेली होती. त्याच महिन्यात संशयित चोर ती पल्सर घेऊन कोपरगाव येथे रात्रीच्या वेळी फिरत होता. त्यावेळी रात्री गस्त घालत असलेल्या कोपरगाव पोलिसांनी त्यास हटकले असता पल्सर सोडून पोलिसांना गुंगारा देत होता. कोपरगाव पोलिसांना इंजीन व चेसी नंबरवरून ही पल्सर नाशिकमधील पंचवटी येथील असल्याचे आढळले. त्याप्रमाणे त्यांनी पंचवटी पोलिसांना संपर्क साधला. तेंव्हापासून जवळपास सात ते आठ महिन्यांपासून पंचवटी पोलीस पल्सरचोराच्या मागावर होते. या संशयित पल्सर चोराचे नाव कोपरगाव पोलिसांना समजले होते. तरीदेखील त्याचा सुगावा लागत नव्हता. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर. एन. लिलके व पोलीस शिपाई योगेश ससकर तपास करत होते. पोलीस शिपाई ससकर यांनी तपासाची चक्रे फिरविली आणि अखेर संशयिताच्या नावावरुन त्यांनी शुक्रवारी त्याचा पत्ता मिळविला. पोलीस नाईक लिलके व शिपाई योगेश सस्कर यांनी संशयित रोहित उर्फ रोहिदास कचरू पानसरे यास ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -