घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात पावसाची उघडीप

नाशकात पावसाची उघडीप

Subscribe

शहराला काल मुसळधारेने झोडपून काढल्यानंतर मंगळवारी (दि.2) पावसाने उघडीप दिली.

शहराला सोमवारी मुसळधारेने झोडपून काढल्यानंतर मंगळवारी (दि.2) पावसाने उघडीप दिली. काही भागात हलका शिडकावा झाल्याने 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सोमवारी सरासरी ३६ मिलीमीटर पाऊस झाल्याने जलसाठ्यात 1 टक्का भर पडलेली आहे. तसेच, टँकरची संख्या 79 ने घटली आहे. नाशिकमध्ये उद्या (दि.3) जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शहरात सोमवारी झालेल्या पावसाने ज्या-ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले होते, त्या-त्या ठिकाणी मनपाने आज गटारीतील गाळ उपसा, चेंबर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागात रिमझिम सरी पडल्या होत्या. भद्रकाली परिसरात नागरिकांनी प्लास्टीक खरेदीसाठी गर्दी केलेली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -