घरमहाराष्ट्रनाशिकविनाहेल्मेट दिसल्यास ५०० रुपये दंड, लायसन्स जप्त

विनाहेल्मेट दिसल्यास ५०० रुपये दंड, लायसन्स जप्त

Subscribe

दुसर्‍यांदा विनाहेल्मेट दुचाकीचालक दिसल्यास एक हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द

नाशिक : शहरात मंगळवार (दि.१८) पासून विनाहेल्मेट दुचाकीचालकास ५०० रुपये दंड पोलीस दंड करणार आहेत. दुसर्‍यांदा विनाहेल्मेट दुचाकीचालक दिसून आल्यास त्यास एक हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. दंड न भरल्यास वाहन ताब्यात घेण्यात येणार आहे. दंड भरल्यानंतरच वाहनचालकांचे वाहन ताब्यात दिले जाणार आहे.

शहरातील जीवघेणे अपघात रोखण्यासह वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गतवर्षी अनोख्या पद्धतीने हेल्मेट मोहीम राबवली. पोलीस आयुक्तांनी नो हेल्मेट, नो पेट्रोल ही पहिली मोहीम राबवली. त्यानंतर दुसरी नो हेल्मेट दोन समुपदेशन, तिसरी नो हेल्मेट, नो प्रेवश या मोहिमा राबवल्या. या मोहिमेअंतर्गत दुचाकीचालकांना हेल्मेट नियमित वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

- Advertisement -

तरीही, बेशिस्त वाहनचालक हेल्मेट वापरत नसल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. शहरात १२ ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकीचालकांना दोन तासांचे समुपदेशन केले जात आहे. चालकांना वाहतूक नियमांचे पुस्तकाचे वाचन करण्यास सांगितले जात आहे. त्यानंतर परीक्षा घेतली जात आहे. १ नोव्हेंबर २०२१ ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत तब्बल १० हजार ५६१ विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

शहरात मंगळवार (दि.१८)पासून वाहतूक पॉईंट व समुपदेशन केंद्रावर विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे ई चलन कार्यप्रणालीअंतर्गत ५०० दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे आता हेल्मेट परिधान करुनच दुचाकी चालवावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवतांना प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे. वाहन चालकांवर पोलीसांची करडी नजर असेल.

- Advertisement -

वर्षभरात १११ विनाहेल्मेट दुचाकीचालकांचा मृत्यू

नाशिक शहरात १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत तब्बल ११६ दुचाकीचे जीवघेणे अपघात झाले आहेत. त्यामध्ये १२४ दुचाकीचालकांचा मृत्यू झाला आहे. तर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यामुळे १११ दुचाकीचालकांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई केली जाणार आहे. दुचाकीचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करा. दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरुन वेळेचा अपव्यय व दंडात्मक कारवाई टाळावी.
– दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त, नाशिक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -