घरमहाराष्ट्रनाशिकपाणीपुरवठ्याची वीज खंडित केल्याने सरपंच परिषद आक्रमक

पाणीपुरवठ्याची वीज खंडित केल्याने सरपंच परिषद आक्रमक

Subscribe

वीज कनेक्शन बंद करण्यात आल्याने आक्रमक अखिल भारतीय सरपंच परिषद

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन बंद करण्यात आल्याने आक्रमक झालेल्या, अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नाशिक शाखेच्यावतीने महावितरण कार्यालयवर धडक देत बंद केलेला वीज पुरवठा त्वरीत सुरू न केल्यास सोमवार (दि.२५) पासून थेट उपोषण करण्याचा इशारा दिला.

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नाशिक शाखेच्यावतीने विविध ग्रामपंचायतींच्या सरपंच यांनी नाशिकरोड येथील महावितरण कार्यालयावर गुरूवारी (दि.२१) आंदोलन करत, निवेदन दिले. यावेळी सरपंच परिषद महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिल ढिकले, जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर, जिल्हा कार्याध्यक्ष सदानंद नवले, जिल्हा संघटक समाधान घोडके, उपाध्यक्ष समाधान बोडके, नवनाथ गायधनी, सागर जाधव, विजय रिकामे, राहुल पाटील, रावसाहेब कोठुळे, पांडुरंगाची आचारी ,अलका झोंबाड, दीपक हागवणे, भाऊसाहेब म्हैसधुणे, विष्णू पेखळे, आत्माराम दाते, विकास जाधव, मधुकर ढिकले अंबादास ढिकले ,भास्कर थोरात, प्रशांत देशमुख ,ज्ञानेश्वर शिंदे ,अनिल बिन्नर आदी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -