घरमहाराष्ट्रनाशिकसेवानिवृत्त जवान प्रशांत सोनवणे यांची सामाजिक बांधिलकी

सेवानिवृत्त जवान प्रशांत सोनवणे यांची सामाजिक बांधिलकी

Subscribe

४० ते ५० गरिबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप; ग्रा. पं. आणि नागरिकांतर्फे सत्कार

प्रकाश शेवाळे : जायखेडा
सध्या जगभरासह भारतात कोरोनासारख्या महामारीने नागरिकांना घरातच लॉकडाऊन केल्याने गोर-गरीबांचे हाल होत असतांना लष्कराच्या माध्यमातून देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होत असलेल्या दिवशी बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील प्रशांत भालचंद्र सोनवणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत ४० ते ५० गोर-गरीब नागरिकांना जीवनावश्यक वतुंच्या किटचे वाटप करून देश सेवेची असलेली कदर यामाध्यमातून व्यक्त केली आहे. यावेळी या जवानाचा ग्रामपंचायत व नागरिकांकडून यथोचित सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या आगळय़ावेगळय़ा कार्यक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
विविध क्षेत्रात कार्य करून सेवानिवृत्त होऊन कर्मचारी व अधिकारी पार्टी करून मज्जा करतांना आपण नेहमी बघतो. ठिकठिकाणी उधळपट्टी केली जाते. मात्र, याला अपवाद म्हणून भारतीय लष्करातून आपली १७ वर्ष सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाचे सुपुत्र प्रशांत भालचंद्र सोनवणे यांनी कुठल्याही प्रकारची उधळपट्टी न करता, सोनवणे यांनी या सर्व गोष्टींना बगल देत देशसेवेसाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपले आयुष्य घालवले, समाजाप्रती असलेली सहानुभूती व निस्सीम असे प्रेम, नसानसात देशाप्रती सळसळते रक्त… यामुळेच सामाजिक बांधिलकी जपत गावातील गोर-गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून सीमेवर फडकणारा तिरंगा वाऱ्यामुळे नाहीतर… सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या श्वासाने फडकतो या ओळीप्रमाणे भारतीय लष्कर दलाचे काम असते. यामाध्मातून सोनवणे यांनी दाखवून दिले आहे. सोनवणे हे लष्करात ‘ईएमई’त टेक्निकल पदावर होते. त्यांचा प्रवास हरियाणा या राज्यापासून सुरु होऊन मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, परत हरियाणा येथे बदली होऊन याच राज्यातून प्रशांत सोनवणे सेवानिवृत्त झाले आहेत.
दरम्यान, भारतीय लष्करात विविध संकटाना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. अशा जवानाचा ग्रामपंचायत कडून सत्कार करणेही अपेक्षित होते. गावाचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने सेवानिवृत्त जवान प्रशांत सोनवणे यांचा यथोचित सन्मान करण्याचे सरपंचासह ग्रामस्थांनी ठरविले होते. परिणामी, या शुभमुहुर्ताला कोरोनाचा अडसर आल्याने सोशल डिस्टसिंग पाळून ग्रामपंचायत प्रशासनाकडून छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे वडील भालचंद्र सोनवणे, आई रुखमाबाई सोनवणे, पत्नी सिमा सोनवणे, मुलगा आयुष सोनवणे, मुलगी रिया सोनवणे उपस्थित होते.

… अन् कुटुंबियांचे डोळेही पाणावले

सेवानिवृत्त होऊन घरी अर्थातच जन्मभूमीत परतलेल्या लष्करी जवान प्रशांत सोनवणे यांच्या कुटुंबियांचे डोळेही पाणावले होते. या जवानाच्या लहान मुलांचे डोळे शोधात होते आपल्या वडिलांना… त्याच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर वडिलांनी भेटण्याची आतुरता दिसत होती. हीच आतुरता सोनवणे यांच्या डोळ्यात देखील होती. यावेळी मुलांनी आपले बाबा दिसताच धावत जाऊन त्यांना आलिंगन दिले. तो क्षण अंगावर शहारे उभा करणारा होता. तर घरच्या सदस्यांना भेटल्याचा आनंद लष्करी जवान प्रशांत सोनवणे यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. टो क्षण कैद करून ठेवावा असाच होता. कुटुंब आणि जवान यांच्यामध्ये झालेले संभाषण ऐकताना अनेक जण भावूक झाले.
माझ्या मातीत आपुलकीने माझा सन्मान झाला, याचा गर्व नक्कीच आहे. भारतीय लष्करात टेक्निकल विभागात चांगली सेवा देता आली, याचा अभिमान आहे. सेवानिवृत्त होत असतांना मी व्यर्थ खर्च टाळत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोर गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आत्मिक समाधान मिळाला.
– प्रशांत सोनवणे, सेवानिवृत्त जवान, जायखेडा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -