घरक्राइमटँकरमधून पेट्रोल चोरीचे प्रकार सुरूच;मनमाड मध्ये अवैध इंधन विक्री अड्ड्यावर छापा

टँकरमधून पेट्रोल चोरीचे प्रकार सुरूच;मनमाड मध्ये अवैध इंधन विक्री अड्ड्यावर छापा

Subscribe

नाशिक : वेगवेगळ्या उपाययोजना करून देखील मनमाड येथील टँकरमधून इंधन चोरी करण्याच्या घटनांवर कायमस्वरूपी ब्रेक काही लागत नाही. टँकरमधून इंधन चोरी करून त्याची अवैध विक्री करणार्‍या एका अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून ४० लिटर पेट्रोलसह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी एका आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील चांदवड रोडवरील पाटील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या वसाहतीजवळ पेट्रोल विक्रीचा अवैध अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पी.डी. सरोवर, पोलीस पी.एन. नरोटे, गौतम गांगुर्डे, रणजित चव्हाण, राजेंद्र खैरनार आदींच्या पथकाने सापळा रचून या अड्ड्यावर छापा मारला आणि २०-२० लिटरच्या पेट्रोलने भरलेल्या दोन कॅनसह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी कल्पेश आहेर (वय २७, रा. शिवशक्ती नगर) याला अटक करुन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

- Advertisement -

मनमाडपासून ४ ते ७  कि.मी. अंतरावर नागापूर-पानेवाडी परिसरात इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे इंधन प्रकल्प असून या तिन्ही प्रकल्पांतून रोज सुमारे दीड हजार टँकर्सच्या माध्यमातून राज्यभरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. सुमारे 12 वर्षांपूर्वी इंधनाच्या अवैध अड्ड्यावर छापा मारण्यासाठी गेलेले मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना इंधन माफियांनी जिवंत जाळून ठार मारल्याची घटना घडल्यानंतर इंधन चोरीला आळा बसविण्यासाठी तिन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र तरी देखील कधी बनावट चावीचा वापर करून तर कधी टँकरच्या लॉक सिस्टीममध्ये फेरफार करून इंधन चोरी केली जात असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -