घरक्राइमवाळू माफियांची दहशत संपेना; थेट तलाठी, कोतवालास मारहाण

वाळू माफियांची दहशत संपेना; थेट तलाठी, कोतवालास मारहाण

Subscribe

पैठण : तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून सोमवारी (दि. २७) रात्री अवैध वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यासह कोतवालाला वाळू माफियांनी लाकड्याच्या दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून पैठण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन चौघा आरोपींना अटक देखील करण्यात आली.तसेच या घटनेमुळे वाळू माफियांची मुजोरी वाढल्याचे दिसून येते.

या घटनेची अधिक माहिती अशी की, सोमवारी दि,२७ रोजी रात्री गोदावरी नदी पाञातून अवेधरीत्या वाळूची वाहतूक रहाटगाव आपेगाव ते सोलनापुर मर्गावर सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पैठण तहसिल कार्यालयातील वाळू पथकातील बालानगर सजाचे तलाठी रमेश पाराजी फटांगडे व कोतवाल रवींद्र रंगनाथ सोनटक्के यांनी सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास एका खाजगी वाहनाने पोलीस संरक्षण सोबत न ठेवता अवैध वाळू वाहतूक विरुध्दात करवाई करण्यासाठी सोलानपूर, रोडवर वाळूने भरलेल्या एका वाहनाला आडवून त्याच्या जवळ कुठलेच परवाना न सापडल्याने सदरील वाहन जप्त करून तहसील कार्यालयात घेऊन येत असताना सदरील वाहन चालक मालक यांनी तलाठी रमेश फटांगडे व रवींद्र सोनटक्के कोतवाल यांनी लाकडी दांड्याने जबरी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे सदरील घटनेची माहिती तहसीलदार शंकर लाड, नायब तहसीलदार गिरजाशंकर आवळे यांना दिली असता त्यांनी मध्यरात्री पैठण पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पैठण पोलीस ठाण्यात तलाठी रमेश फटांगडे यांच्या फिर्यादीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, पोना गोपाल पाटील यांनी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

मंगळवारी रोजी सकाळी वाहन मालक प्रतीक भोज, चालक शैलेश मानमोडे या आरोपीना अटक करण्यात आले आहे. दरम्यान पैठण तालुक्यात गोदावरी नदी पाञातून बिनधास्ता वाळूची चोरी करण्यात येत आहे.हा सगळा प्रकार राञीला चालत असतो. राञी बेराञीला एकामागून एक वाळूने भरलेले वाहन सुसाटपणे पाचोड मार्गे छञपती संभाजीनगर तसेच तालुक्यातील अंतर्गत आडमार्गाने शहरात दाखल होतात.तरी पण या बाबीकडे महसूल तसेच पोलिस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागारिकांकडून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -